Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुरमेहर कौरने एकाच ट्विटमध्ये साधला रणदीप हुड्डा अन् वीरेंद्र सेहवागवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2017 16:44 IST

सोशल मीडियावरील व्हिडीओ आणि वक्तव्यामुळे ट्रोलला बळी पडलेल्या गुरमेहर कौर हिने एकाच ट्विटमध्ये रणदीप हुड्डा आणि माजी क्रिकेटपटू वीरेंद्र ...

सोशल मीडियावरील व्हिडीओ आणि वक्तव्यामुळे ट्रोलला बळी पडलेल्या गुरमेहर कौर हिने एकाच ट्विटमध्ये रणदीप हुड्डा आणि माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यांच्यावर निशाणा साधला आहे. अभिनेता रणदीप हुड्डा याने गेल्या बुधवारी, दिल्ली विश्वविद्यालयाची विद्यार्थिनी गुरमेहर कौर हिच्याशी संबंधित केलेल्या ट्विटविषयी अधिक सतर्कता बाळगायला हवी होती, असे म्हटले आहे. श्रीराम कॉलेजची विद्यार्थिनी आणि शहीद कॅप्टन मनदीप सिंग यांची मुलगी असलेल्या गुरमेहर हिने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात सोशल मीडियावर अभियान छेडले होते, जे सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यातच गुरमेहरचा एक जुना व्हिडीओही पुढे आला असून, ज्यामध्ये ती तिच्या वडिलांच्या मृत्यूस पाकिस्तान नव्हे तर युद्धच कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.}}}} गुरमेहरच्या या व्हिडीओवर वीरेंद्र सेहवाग आणि रणदीप हुड्डा यांनी कठोर शब्दात टीका केली होती. मात्र काही काळानंतर उपरती झालेल्या रणदीपने ‘मी ट्विट केले नव्हते तर माझ्या हाताने ट्विट केले’ असा खुलासा केला होता. त्यावर गुरमेहरने रणदीपचे हे ट्विट त्याच्या खुलासा केलेल्या बातमीशी पोस्ट केले आहे. वास्तविक गुरमेहरच्या या ट्विटची स्टाइल वीरेंद्र सेहवागच्या ट्विटच्या स्टाइलप्रमाणे होते. वीरेंद्र सेहवागने गुरमेहरला ट्रोल करताना लिहिले होते की, ‘मी रन नाही काढले, तर माझ्या बॅटने रन काढले आहेत’ याच ट्विटला रणदीप हुड्डाने ट्विट केले होते. जेव्हा रणदीपला त्याच्या या ट्विटविषयी विचारण्यात आले होते, तेव्हा त्याने पीटीआयला सांगितले होते की, ‘माझे ट्विट महिला केंद्रित नव्हते. मी खासगी राजकारण पसरविणाºया विचारांच्या विरोधात आहे. देशातील महिलांप्रतीचे वातावरण बघता मी अधिक सतर्क राहायला हवे’. पुढे बोलताना रणदीपने हेही स्पष्ट केले की, सोशल मीडियावर मी नेहमीच ट्रोलिंगला बळी पडलो आहे. त्यामुळे गुरमेहरसाठी हा अनुभव खूपच दु:खद असेल, तिच्याबरोबर असे व्हायला नको होते. तसेच जेव्हा मी ट्विट केले होते, तेव्हा गुरमेहरला कोणीतरी धमकी दिली होती, याविषयी मला काहीच माहीत नव्हते. त्यामुळे माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचेही त्याने स्पष्ट केले.