Join us
Daily Top 2Weekly Top 5

कपिल शर्माची ऑनस्क्रीन पत्नी अडकली लग्नबेडीत, लग्नात कपिलनं लगावले ठुमके

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 13:52 IST

कपिल शर्माने ऑनस्क्रीन पत्नीच्या लग्न सोहळ्यात केली धमालमस्ती

बॉलिवूडचा प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माचा पहिला सिनेमा 'किस किस को प्‍यार करूं'मध्ये अभिनेत्री सिमरन कौर मुंडी हिने त्याच्या पत्नीची भूमिका केली होती. नुकतीच सिमरन गुरूदास मान यांचा मुलगा गुरिक मानसोबत लग्नबेडीत अडकली आहे.

कपिल शर्माची ऑन स्क्रीन पत्नी राहिलेली अभिनेत्री सिमरन कौर मुंडी तिचा बॉयफ्रेंड गुरिक मानसोबत विवाहबंधनात अडकली आहे. गुरिक मान प्रसिद्ध पंजाबी सिंगर गुरदास मान यांचा मुलगा आहे. पटियालामध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला. यावेळी बॉलिवूड व पंजाबी सिनेइंडस्ट्रीतल्या कलाकारांनी हजेरी लावली होती. कपिल शर्माने देखील या लग्नाला हजेरी लावली होती आणि पार्टीत गुरूदास मान यांच्यासोबत डान्सही केला. या लग्नात विकी कौशल, सोनाली सहगल, बादशाह, गुरू रंधावा, पंजाबी सुपरस्टार एमी विर्क व हर्षदीप कौर यांसारखे कलाकार उपस्थित होते. 

सिमरन व गुरिक यांच्या अनंत कारजचा रिवाज पटियाला येथील एका गुरूद्वारामध्ये पार पडला. त्यानंतर संध्याकाळी रिसेप्शन ठेवण्यात आले होते. 

गुरिक व सिमरन बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अखेर ते ३१ जानेवारीला लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. या लग्नात सलमान खानची बहिण अलवीरादेखील आपल्या नवऱ्यासोबत गेली होती.

या लग्नातील व्हायरल झालेल्या व्हिडिओत कपिल शर्मा सिमरनला लग्नाच्या शुभेच्छा देताना दिसतो आहे आणि गुरिकला लग्नावरून छेडताना दिसत आहे.

कपिलचा कॉमे़डी अंदाज इथेदेखील पहायला मिळाला.

टॅग्स :कपिल शर्मा