Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 21:25 IST

गुलशन कुमार यांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘मुघल’ या चित्रपटाबद्दल एक आनंदाची बातमी आहे. होय, या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची सूत्रे आता राजकुमार हिराणी यांच्याकडे येण्याची शक्यता आहे. 

गुलशन कुमार यांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘मुघल’ या चित्रपटाबद्दल एक आनंदाची बातमी आहे. होय, या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची सूत्रे आता राजकुमार हिराणी यांच्याकडे येण्याची शक्यता आहे. आमिर खानही या चित्रपटात परतण्याची शक्यता आहे.‘मुघल’ हा चित्रपट आधी दिग्दर्शक सुभाष कपूर दिग्दर्शित करणार होते. पण ‘मीटू’मोहिमेअंतर्गत अभिनेत्री गितिका त्यागी हिने सुभाष कपूर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे गंभीर आरोप केलेत. या आरोपानंतर आमिर खानने सुभाष कपूरसोबत काम करण्यास नकार दिला होता. शिवाय ‘मुघल’मधून बाहेर पडत असल्याचे त्याने जाहिर केले होते. आमिरच्या या कठोर भूमिकेनंतर सुभाष कपूर यांना ‘मुघल’मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.सुभाष कपूर यांच्यानंतर हा चित्रपट कोण दिग्दर्शित करणार? नव्या दिग्दर्शकासोबत काम करण्यास आमिर खान पुन्हा राजी होणार का? असे प्रश्न चाहत्यांना पडले होते. तूर्तास तरी या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी वाटत आहे. ‘मुघल’च्या मेकर्सनी दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्याजागी राजकुमार हिराणींना घेण्याचे ठरवले असल्याचे कळतेय. राजकुमार हिराणी म्हटल्यावर आमिरही या चित्रपटाला नकार देणे शक्यचं नाही. हिराणींसोबत आमिरने याआधी दोन चित्रपट केले आहेत.‘मुघल’मध्ये सोनाक्षी सिन्हाही महत्त्वपूर्ण भूमिकेत असल्याचे कळतेय. तिची भूमिका लहान असेल पण अतिशय दमदार असेल, असे सांगितले जात आहे.

टॅग्स :आमिर खानराजकुमार हिरानी