Join us

घटस्फोटनंतर आपल्या एक्स पत्नीला डेट करतोय अभिनेता, म्हणाला-आम्ही ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 13:58 IST

दहाड फेम अभिनेता गुलशन देवैया त्याच्या खासगी आयुष्याला घेऊन चर्चेत आला आहे.

दहाड फेम अभिनेता गुलशन देवैया त्याच्या खासगी आयुष्याला घेऊन चर्चेत आला आहे. अभिनेता पुन्हा एका त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीला डेट करत असल्याची चर्चा आहे. गुलशनने यावर खुलासा देखील केला आहे. गुलशन देवैया आणि कल्लिरोई तजियाफेटा  यांचा २०१२ मध्ये विवाह झाला होता. 2020 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला

नुकत्याच  दिलेल्या एका मुलाखतीत गुलशनने त्याची आणि कल्लिरोईची लव्हस्टोरी सांगितली. तो म्हणाला की, यावर बोलण्यास त्याची हरकत नाही कारण लोकांना हे कळावे की लोकांच्या बाबतीत वाईट गोष्टी घडत असल्या तरी, काही गोष्टी ज्या बदलू शकतो त्यासाठी नक्कीच प्रयत्न करा. 

गुलशनला त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीला डेट करण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. गुलशन म्हणाला, भारतात फिरत असताना तेव्हा त्याची भेट कल्लिरोईसोबत भेट झाली आणि तो तिच्या प्रेमात पडला. यानंतर दोघांनी लग्न केलं.परंतु काही काळानंतर गोष्टी कठीण होऊ लागल्या.

अभिनेता म्हणाला, 'फक्त प्रेमात असणे पुरेसे नव्हते. आम्ही एकमेकांशी संवाद साधायला देखील तयार नव्हतो. तुम्हाला तुमच्या आयुष्यात स्थिर असे काहीतरी हवं असतं आणि मी निराश झालो होतो कारण आमचा संसारात स्थिरता नव्हती. त्यामुळे त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.  

तो म्हणाले की त्यांचे एकमेकांवरील प्रेम अजूनही कायम असल्याचे त्यांना नंतर लक्षात आलं. गुलशन देवय्या म्हणाले, 'आम्ही त्याचे मैत्रीत रूपांतर केले. तिने केलेल्या प्रयत्नांबद्दल मी तिचा खूप आभारी आहे.लग्नाच्या प्रश्नावर तो म्हणाला, 'मला माहित नाही. मला जास्त विचार करायचा नाही. मला आत्ता इथे राहून या क्षणाचा आनंद घ्यायचा आहे.

टॅग्स :सेलिब्रिटी