Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘सिम्रन’ मध्ये कंगना बनणार ‘गुजराती रॉबर’ ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2016 10:47 IST

वेल, दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेते जर एकत्र आले तर काय होईल याचा विचार के लाय का कधी? नाही ना. ...

वेल, दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेते जर एकत्र आले तर काय होईल याचा विचार के लाय का कधी? नाही ना. मग आता करा. कारण दिग्दर्शक हंसल मेहता आणि अभिनेत्री कंगना राणावत हे त्यांच्या आगामी चित्रपट ‘सिम्रन’ साठी एकत्र येणार आहेत.विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’ चित्रपटासाठीचे शूटिंग तिने नुकतेच संपवले आहे. आणि त्यानंतर ती बहीण रंगोली सोबत थोडीशी शॉपिंग करायला गेली. तसेच ती कुणालाही कळू न देता जर्मनीत आॅस्ट्रियन बॉर्डर येथे हॉर्स रायडिंग, ट्रेकिंग आणि माऊंटेन क्लायम्बिंग करण्यासाठी गेली.तिथून आल्यानंतर तिला हंसल मेहता यांच्या आगामी ‘सिम्रन’ या चित्रपटाची शूटिंग करावयाची आहे. सध्या चित्रपटाचे शीर्षक ‘सिम्रन’ असे ठेवण्यात आलेले आहे. ७० दिवस हेच चित्रपटाचे शेड्यूल असून काही शूटिंग भारतात होणार आहे.यात कंगणा गुजराती मुलीची भूमिका क रणार आहे. चित्रपटाचे कथानक काही असे आहे की, सिम्रन ही गुजराती मुलगी कॅलिफोर्नियाला जाते आणि काही गुन्ह्यांमध्ये अडकते. ही कथा सत्य कथेवर आधारित असून आईचे स्वप्न पूर्ण करायला ती खुप प्रयत्न करते.