Join us

Grandma Day: आजीसोबत आलिया भट्टने असा घालवला वेळ! फोटो होतोय व्हायरल!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2018 15:24 IST

बॉलिवूडची सगळ्यात यंगेस्ट अ‍ॅक्ट्रेस आलिया भट्ट सध्या जाम बिझी आहे. एक सिनेमा हातावेगळा केला की दुसरा तयार, अशीच आलियाची ...

बॉलिवूडची सगळ्यात यंगेस्ट अ‍ॅक्ट्रेस आलिया भट्ट सध्या जाम बिझी आहे. एक सिनेमा हातावेगळा केला की दुसरा तयार, अशीच आलियाची सध्या स्थिती आहे. ‘राजी’चे शूटींग संपताच आलियाने ‘गली बॉय’चे शूटींग सुरु केले. हा चित्रपट संपत नाही तोच ती ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचे शूटींग सुरु करणार आहे. एंकदर काय तर आलिया प्रचंड बिझी आहे. पण इतक्या बिझी शेड्यूलमध्येही आपल्या लोकांसाठी वेळ काढण्याची कला आलियाला चांगलीच आत्मसात आहे. होय, आलियाने एक फोटो शेअर केला आहे.या फोटोत आलिया तिच्या आजीसोबत बसलेली दिसतेय. आजीसोबत बसलेली आलिया काही जुन्या आठवणींना उजाळा देत असल्याचे या फोटोत दिसतेय. आलिया व तिच्या आजीचा हा फोटो लोकांना प्रचंड आवडतो आहे. आत्तापर्यंत साडे सात लाखांवर लोकांनी या फोटोला लाईक केले आहे.  हा फोटो शेअर करताना ‘ग्रँडमा डे’ असे आलियाने लिहिलेय. आलियाचा आजीसोबतचा हा फोटो आम्हाला जाम आवडला. तुम्हाला तो कसा वाटला, हे सांगायला विसरू नका.आलिया तिच्या आजीच्या अतिशय जवळ आहे.  आलियाच्या एका बर्थ डेला तिच्या आजी आजोबांनी अनोख्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांनी स्वत: रात्री बाराच्या ठोक्याला माऊथ आॅर्गन व व्हायोलिनवरून ‘हॅपी बर्थ डे’ सॉन्ग गात तिला विश केले होते. आजी आजोबाचे हे सरप्राईज पाहून आलियाला रडू कोसळले होते. तिचा हा व्हिडिओही खूप व्हायरल झाला होता.ALSO READ : ​‘गली बॉय’च्या सेटवरचे आलिया भट्ट व रणवीर सिंगचे फोटो लिक! पाहून तुम्हालाही बसेल धक्का !!आलियाचा ‘राजी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित हा चित्रपट धर्मा प्रॉडक्शन प्रोड्यूस करतो आहे. यात ती विकी कौशलसोबत दिसणार आहे.  ‘राजी’मध्ये आलिया एका काश्मीरी मुलीची भूमिका साकारणार आहे. जिचा विवाह पकिस्तानी लष्कर अधिकाºयाशी होतो. 1971साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान आलिया भारतातील गुप्त माहिती पाकिस्तानी अधिकाºयांना देते, असे याचे कथानक आहे. हा चित्रपट हरिंदर सिक्का यांच्या कॉलिंग सहमत या कांदबरीवर आधारित आहे.