Join us

गोविंदाच्या 'आ गया हिरो'ची रिलीज डेट पुढे ढकलली ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 12:46 IST

आ गया हिरो या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली आहे.  याआधी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 24 फेब्रुवारी निश्चित ...

आ गया हिरो या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली आहे.  याआधी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 24 फेब्रुवारी निश्चित करण्यात आली होती त्यानंतर 3 मार्च करण्यात आली होती मात्र डिस्ट्रब्यूटर न मिळाल्याने ती आता 17 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र 17 मार्चला ही हा चित्रपट प्रदर्शित होईल की नाही याबाबत साशंकता आहे.  गोविंदाच्या वाढदिवशी डिसेंबरमध्ये या चित्रपटाचा प्रोमो रिलीज करण्यात आला होता. यावेळी दिलेल्या इंटरव्ह्यू दरम्यान तो म्हणाला होता मला कोणताही बॉलिवूड स्टार सपोर्ट करत नाही आहे. हे ऐकून सलमानने गोविंदाला हात देत बिग बॉसच्या सेटवर प्रमोशनसाठी बोलवले होते.  मात्र त्याचा ही फारसा काही उपयोग झालेला दिसत नाही बिग बॉसच्या मंचावर चित्रपटाचे प्रमोशन करुनही त्याला डिस्ट्रीब्यूटर मिळाला नाहीच.त्यानंतर गोविंदाने डेविड धवन आणि वरुण धवनला टेर्गेट करुन कॉन्ट्रोवर्सी क्रिएट केली होती त्याचा ही फायदा गोविंदाला झालेला दिसत नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डिस्ट्रीब्यूटरना हा चित्रपट 3 वर्ष जुना वाटत असल्याने कोणीही घेण्यास तयार नाही. ना या चित्रपटातचे म्युझिक हिट झाले ना प्रोमा काही जादू करु शकला. गोविंदाने आ गया हिरो चित्रपटात पूनम पांडेचे आयटम साँग आहे. मात्र तिचे आयटम साँग ही काही कमाल करु शकले नाही आहे. डिस्ट्रीब्यूटर न मिळाल्याने गोविंदाचा चित्रपट नक्की कधी प्रदर्शित होणार यावर सस्पेंस कायम आहे.