Join us

घटस्फोटांच्या चर्चांमध्ये गोविंदाची बायको सुनीताची लागली लॉटरी, समोर आला 'तो' व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 15:06 IST

गोविंदाची बायको सुनीतानं पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलंय

प्रसिद्ध चित्रपट निर्माती, नृत्यदिग्दर्शिका आणि युट्यूबर फराह खान आता एका नव्या शोसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिच्या या नव्या शोचं 'आंटी किसको बोला?' (Aunty Kisko Bola?) असं नाव आहे. हा खास महिलांसाठी तयार करण्यात आलेला एक टॅलेंट शो असून तो लवकरच तिच्या यूट्यूब चॅनलवर सुरू होत आहे.फराह खानने तिच्या इंस्टाग्रामवर या शोचा व्हिडीओ शेअर करून याबाबतची घोषणा केली आहे.

 फराह खानने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत तिचा भाऊ साजिद खान आणि अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा दिसत आहेत. हे दोघे या शोमध्ये परीक्षक म्हणून काम करणार आहेत.  फराहने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "साजिद खान आणि सुनीता आहुजा यांचे आभार, जे जज बनून प्रत्येक महिलेमध्ये लपलेली प्रतिभा बाहेर काढण्यास मदत करत आहेत".

गेल्या काही काळापासून सुनीता अहुजा आणि गोविंदा हे घटस्फोटाच्या चर्चांमुळे चर्चेत होती. मात्र, नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात हे दोघे एकत्र दिसले आणि त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. यावेळी माध्यमांशी बोलताना सुनीताने सांगितले की, "कोणतीही शक्ती आपल्याला वेगळे करू शकत नाही. ना देव ना सैतान. माझा गोविंदा फक्त माझा आहे". फराहच्या या नवीन शोमध्ये सुनीता आता एका नव्या भूमिकेत दिसणार असल्याने तिच्या चाहत्यांमध्येही उत्सुकता वाढली आहे.

फराह खान ही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी कोरिओग्राफींपैकी एक आहे. तिने ८० हून अधिक चित्रपटांमधील १०० हून अधिक गाणी कोरिओग्राफ केली आहेत आणि तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. तिच्या या नवीन शोला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

टॅग्स :गोविंदाफराह खान