Join us

"एका मुर्ख महिलेसाठी तो...", मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा, पत्नीने सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 14:57 IST

गोविंदाचं ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याचंही बोललं जात होतं. आता यावर सुनिता अहुजा यांनी मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे. 

बॉलिवूड अभिनेता गोविंदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा घटस्फोट घेत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण, या अफवा असल्याचं सुनिता अहुजा यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर गोविंदाचं ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याचंही बोललं जात होतं. आता यावर सुनिता अहुजा यांनी मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे. 

सुनिता अहुजा यांनी टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केलं. गोविंदाचं अफेअर या केवळ अफवा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. "हो, या सगळ्या गोष्टी माझ्या कानावर आल्या आहेत. पण, हे सगळं फालतू आहे. त्याचं अफेअर करण्याचं वय नाही. गोविंदा ६२ वर्षांचा आहे. त्याचं आजोबा व्हायचं वय आहे. टीनाचं लग्न करायचं आहे. यशचं नातवंड बघायचं आहे. अफेअर करण्याची ही वेळ नाही. कोणत्याही मूर्ख महिलेसाठी गोविंदा कुटुंबाला सोडणार नाही", असं सुनिता अहुजा म्हणाल्या. 

गोविंदा आणि सुनिता अहुजा यांनी १९८७ साली लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला ३८ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या दोघांना टीना आणि यशवर्धन ही दोन मुलं आहेत. पण, आता त्यांच्या नात्यात दुरावा आला असून ते वेगळे होणार असल्याचं बोललं जात आहे.  

टॅग्स :गोविंदासेलिब्रिटी