Join us

म्हणून अनेक सुपरहिट सिनेमे देऊनही गोविंदाला मिळाला नाही एकही पुरस्कार...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 10:14 IST

90 च्या दशकात गोविंदा नावाची क्रेज होती. गोविंदाने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. या हिट चित्रपटाची यादी बरीच मोठी आहे. पण इतके असूनही गोविंदाला आजपर्यंत एकही पुरस्कार मिळाला नाही. असे का?

ठळक मुद्देगोविंदा सध्या चित्रपटांपासून दूर आहे. पण सोशल मीडियावर तो अ‍ॅक्टिव्ह दिसतो. नुकतेच त्याने ‘बॉटल कॅप चॅलेंज’ पूर्ण केले होते.

अभिनेता गोविंदा अलीकडे ‘रंगीला राजा’ या चित्रपटात दिसला.  पण बॉक्स ऑफिसवर त्याचा हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. 90 च्या दशकात गोविंदा नावाची क्रेज होती. गोविंदाने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. या हिट चित्रपटाची यादी बरीच मोठी आहे. पण इतके असूनही गोविंदाला आजपर्यंत एकही पुरस्कार मिळाला नाही. असे का? अलीकडे एका शोमध्ये गोविंदाला नेमका हाच प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने चांगलेच मजेशीर उत्तर दिले.

‘आप की अदालत’ या कार्यक्रमात गोविंदाने हजेरी लावली. तुझे बहुतेक चित्रपट सुपरहिट झालेत. याऊपरही तुला पुरस्कार मिळाला नाही, याचे दु:ख वाटते का? असे त्याला विचारण्यात आले. या प्रश्नावर गोविंदा अनेक क्षण शांत बसला आणि मग प्रेक्षकांकडे पाहत, मी पुरस्कार खरेदीच केले नाहीत, असे तो म्हणाला. त्याच्या या उत्तराने बॉलिवूडच्या अवार्ड शोचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले. बॉलिवूडमध्ये दिल्या जाणा-या पुरस्कारांवर अनेकांनी प्रश्नचिन्ह लावले.

यात अक्षय कुमार, कंगना राणौत, आमिर खान असे अनेक स्टार आहेत. अलीकडे अक्षयही यावर बोलला होता. अनेकदा अवार्ड शोमध्ये अवार्ड देण्याच्या बदल्यात मला माझ्या परफॉर्मन्सची फी कमी करण्यास सांगितले जाते. तुम्ही फी कमी करा, आम्ही तुम्हाला अवार्ड देऊ, असे आयोजक मला म्हणतात. पण मी त्यांना तिथेच सुनावतो. तुमचे अवार्ड तुमच्याजवळ ठेवा, मला फक्त माझी पूर्ण फी द्या, असे मी अनेकांना सुनावले असल्याचे अक्षय म्हणाला होता.

गोविंदा सध्या चित्रपटांपासून दूर आहे. पण सोशल मीडियावर तो अ‍ॅक्टिव्ह दिसतो. नुकतेच त्याने ‘बॉटल कॅप चॅलेंज’ पूर्ण केले होते. याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता.

टॅग्स :गोविंदा