Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोविंंदा रुग्णालयात दाखल होण्याच्या काहीच तास आधी एअरपोर्टवर दिसली होती पत्नी सुनिता, म्हणाली-

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 14:18 IST

गोविंदावर रुग्णालयात दाखल होण्याआधी त्याची पत्नी सुनिता अहुजा मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. तिने पापाराझींशी साधलेला संवाद चर्चेत आहे

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता गोविंदाला काल रात्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यामुळे गोविंदाच्या चाहत्यांना काळजी आहे. गोविंदाची पत्नी सुनिता अहुजा यावेळी घरी उपस्थित नव्हती. अशातच गोविंदाला रुग्णालयात दाखल करण्याच्या काहीच तास आधी सुनिता एअरपोर्टवर स्पॉट झाली. त्यावेळी पापाराझींशी बोलताना सुनिताने धर्मेंद्र यांच्याविषयी काळजी व्यक्त केली.

पापाराझींनी सुनिता एअरपोर्टवर दिसताच तिला धर्मेंद्र यांच्या यांच्याबद्दल विचारलं. त्यावेळी सुनीताने सांगितलं की, “मी काल पाहिलं, माझे पती गोविंदाजी त्यांना भेटायला गेले होते. धर्मेंद्रजी हे आमच्या कुटुंबातील सर्वाधिक आवडते अभिनेते आहेत आणि ते ही-मॅन आहेत. मी कालपासून माता रानीकडे प्रार्थना करत आहे की ते लवकर बरे व्हावेत. मी नुकतीच मुंबईत परतले आहे आणि धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी नक्कीच रुग्णालयात जाईन. माझी इच्छा आहे की ते पूर्वीसारखे एकदम तंदुरुस्त आणि मस्त व्हावेत. पंजाबी लोक कधीही हार मानत नाहीत, ते नक्कीच लवकर बरे होऊन फर्स्ट क्लास होतील."

गोविंदा यांच्यावरही उपचार सुरू

धर्मेंद्र यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत असतानाच, सुनिता अहुजाला गोविंदाच्या तब्येतीबद्दल मात्र कोणतीही कल्पना नव्हती. दरम्यान काल गोविंदाला तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे आणि डोके जड होणे अशा तक्रारींमुळे मध्यरात्री १ वाजता जुहू येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गोविंदाच्या व्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी त्याला न्यूरोलॉजिस्टला भेटण्याचा सल्ला दिला आहे. गोविंदा सध्या डिस्चार्ज होऊन रुग्णालयातून घरी आलाय असं कळतंय.

English
हिंदी सारांश
Web Title : Govinda's Wife Spotted at Airport Hours Before His Hospitalization

Web Summary : Hours before Govinda's hospitalization for headaches, his wife Sunita was seen at the airport, expressing concern for Dharmendra's health and wishing him a speedy recovery. Govinda is now home after treatment.
टॅग्स :गोविंदाबॉलिवूडटेलिव्हिजन