Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोविंदाचा ३७ वर्षांचा संसार मोडणार? ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत अफेअरच्या चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 13:22 IST

गोविंदा आणि सुनिता अहुजा घेणार घटस्फोट? मराठी अभिनेत्रीसोबत अफेअरच्या चर्चा

बॉलिवूड अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा गेल्या कित्येक वर्षांपासून वेगवेगळे राहतात. याचा खुलासा सुनिता अहुजाने एका मुलाखतीत केला होता. आता गोविंदा आणि सुनिता घटस्फोट घेत वेगळे होणार असल्याच्या चर्चा आहेत. 

मीडिया रिपोर्टनुसार, गोविंदा आणि सुनिता अहुजा ३७ वर्षांच्या सुखी संसारानंतर घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. गोविंदाचं एक्स्ट्रा मरेटिअल अफेअर असल्याने त्यांच्या नात्यात दुरावा आला आहे. अभिनेत्याचं नाव ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे. त्यामुळे गोविंदा आणि सुनिताचा ३७ वर्षांचा संसार मोडणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र अद्याप याबाबत अभिनेत्याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

गोविंदा आणि सुनिताने १९८७ साली लग्न करत संसार थाटला होता. त्यांना टीना आणि यशवर्दन ही दोन मुले आहेत. गोविंदा आणि सुनिता हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल होते. त्यांच्याकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जायचं. मात्र आता त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. 

टॅग्स :गोविंदाघटस्फोटसेलिब्रिटी