अनुष्काने थापल्या शेणाच्या गोव-या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 15:54 IST
चित्रपटात काम करताना काय काय करावे लागते याचा काही नेम नाही. नुकताच ट्रेलर आऊट झालेल्या ‘सुलतान’ चित्रपटात अनुष्काला शेणाच्या ...
अनुष्काने थापल्या शेणाच्या गोव-या
चित्रपटात काम करताना काय काय करावे लागते याचा काही नेम नाही. नुकताच ट्रेलर आऊट झालेल्या ‘सुलतान’ चित्रपटात अनुष्काला शेणाच्या गोव-याही थापाव्या लागल्या. अनुष्काने या चित्रपटात हरियाणवी ग्रामीण महिलेचे पात्र रंगविले आहे. जी पहिलवानही आहे. अनुष्काने ग्रामीण भागातील मुली कशा प्रकारे दिसतात आणि त्या कशापद्धतीने काम करतात हे दाखविले आहे. यात म्हशीच्या शेणापासून गोव-या करताना चित्रपटात तिला दाखविण्यात आले आहे. शेणाच्या गोव-या अगदी ‘शी बाई’ असं काहींना वाटते. पण चित्रपटातील कथानकाची गरज ओळखून काहीही करावे लागते नाही! तिकडे विराटसोबत ती पुन्हा एकत्र आली आहे. त्यामुळे तिला असं काही करावे लागणार नाही, असच दर्शकांना वाटते.