Join us

"रिअल लाइफ प्रेम...", ७० वर्षीय गोविंद यांनी ३१ वर्षीय अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चेवर सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 11:04 IST

३१ वर्षीय शिवांगी ही ७० वर्षांच्या गोविंद नामदेव यांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या. यामुळे त्या दोघांना ट्रोलही करण्यात आलं होतं. आता यावर गोविंद नामदेव यांनी पोस्टमधून भाष्य करत टीकेकारांना उत्तर दिलं आहे.

अभिनेत्री शिवांगी वर्माच्या पोस्टमुळे तिच्या आणि गोविंद नामदेव यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. शिवांगीने गोविंद नामदेव यांच्याबरोबरचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोला तिने "प्रेमाला वय कळत नाही अन् नाही मर्यादा" असं कॅप्शन दिलं होतं. शिवांगीच्या या पोस्टमुळे तिच्यापेक्षा वयाने ५० वर्ष मोठ्या असलेल्या गोविंद नामदेव यांच्या रिलेशनशिपबाबत चर्चा होत होती. याबाबत आता अभिनेत्याने मौन सोडलं आहे. 

३१ वर्षीय शिवांगी ही ७० वर्षांच्या गोविंद नामदेव यांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या. यामुळे त्या दोघांना ट्रोलही करण्यात आलं होतं. आता यावर गोविंद नामदेव यांनी पोस्टमधून भाष्य करत टीकेकारांना उत्तर दिलं आहे. गोविंद नामदेव यांनी शिवांगीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या पोस्टमधून त्यांनी यावर स्पष्टीकरण देत ते दोघंही सिनेमात एकत्र काम करत असल्याचं म्हटलं आहे. 

"हे रिअल लाइफ प्रेम नाही तर रील लाइफ आहे! 'गौरीशंकर गोहरगंज वाले' नावाचा एक सिनेमा आहे. ज्याचं शूटिंग आम्ही सध्या इंदौरमध्ये करत आहोत. ही त्याच सिनेमाची कथा आहे. या सिनेमात एक वृद्ध व्यक्ती तरुण अभिनेत्रीच्या प्रेमात पडतो. वैयक्तिकरित्या मला कोणत्या तरुण मुलीशी प्रेम होणं, हे या जन्मात तरी शक्य नाही", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

गोविंद नामदेव यांनी पुढे पोस्टमध्ये पत्नीबद्दल भाष्य करत ती सर्वस्व असल्याचं म्हटलं आहे. "माझी सुधा, माझा श्वास आहे. विश्वातील प्रत्येक अदा, लोभ, स्वर्गासारखं तिच्यापुढे फिकं आहे. ईश्वराशी मी लढेन, जर त्याने तिच्याबरोबर काही केलं, मग मला शिक्षा झाली तरी हरकत नाही", असं म्हणत त्यांनी पत्नीप्रती प्रेम व्यक्त करत अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटी