Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूनम पांडेच्या अश्लिलतेमुळे गोविंदाने केली तिची हाकालपट्टी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2017 12:45 IST

पूनम पांडे तिच्या सोशल मीडियावरील मादक फोटो आणि व्हिडिओसाठी प्रसिद्ध आहे. लोकप्रियतेसाठी अनेकदा सभ्यतेच्या मर्यादा ओलंडणाऱ्या तिच्या या सवयीमुळे तिला एका मोठ्या संधीपासून मुकावे लागणार आहे.

पूनम पांडे तिच्या सोशल मीडियावरील मादक फोटो आणि व्हिडिओसाठी प्रसिद्ध आहे. लोकप्रियतेसाठी अनेकदा सभ्यतेच्या मर्यादा ओलंडणाऱ्या तिच्या या सवयीमुळे तिला एका मोठ्या संधीपासून मुकावे लागणार आहे. गोविंदाच्या आगामी चित्रपटात तिचे एक गाणे होते. परंतु गोविंदाला जेव्हा तिच्या सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टबद्दल कळाले तेव्हा त्याने तिला बाहेरचा रस्ता दाखवला.‘आ गया हीरो’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झालेला गोविंदा कोणत्यच प्रकारची जोखिम घेऊ इच्छित नाही. त्यामुळे जेव्हा त्याला पूनमच्या सोशल मीडिया अकाउंटबद्दल कळाले आणि स्वत: ते पाहिले तेव्हा त्याने तिचे गाणे सिनेमातून बाद करण्याचा निर्णय घेतला.या सर्व प्रकाराशी संबंधीत एका सुत्राने माहिती दिली की, गोविंदाला जेव्हा त्याच्या निकटवर्तीयाने पूनमचे व्हिडिओ आणि फोटो दाखविले तेव्हा तो तर तडकलाच! पूनमच्या अशा कारनाम्यांचा त्याला काही अंदाजच नव्हता. ‘आ गया हीरो’ हा कौटुंबिक चित्रपट असल्यामुळे पूनमला त्यामध्ये न घेणेच उत्तम राहिल असा त्याला जवळच्या लोकांनी सल्ला दिला. त्यामुळे गोविंदाने पूनमचे गाणे डिलिट केले.मोठ्या पडद्यावर झळकण्याचे पूनमचे स्वप्न मात्र यामुळे भंग पावले असेच म्हणावे लागेल. सध्या ती गोविंदाच्या नावाने खूप खडे फोडत आहे. ती लोकांना सांगत आहे की, गोविंदाने मला वचन दिले आहे की, ते गाणे मोठ्या स्तरावर वेगळ्या पद्धतीने पुन्हा लाँच करण्यात येईल.आता गोविंदाने जरी हे तिला सांगितले असले तरी कोणत्याच प्रोमोशनल कार्यक्रमात तिला सहभागी करून घेण्यात येत नाहीए. पूनमला जरी आशा वाटत असली की, गोविंदाचा विचार बदलेल आणि तो चित्रपटात तिचे गाणे पुन्हा घेईल पण तसे होणे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही.पूनमने मध्यंतरी आंघोळ करतानाचा व्हिडिओ, नाताळाच्या ‘जिंगल बूब’ शुभेच्छा, न्यूड फोटो शेअर केलेले आहेत. सध्या मी एका सिक्रेट प्रोजेक्ट काम करतेय असेदेखील तिने इन्स्टाग्रामवर जाहीर केले आहे. तो सिक्रेट प्रोजेक्ट काय असेल हे मात्र तिने गुपितच ठेवले. पण आतापर्यंतचा इतिहास पाहता हा प्रोजेक्टही मादक आणि वादग्रस्त असेल अशी शंका घेण्यास हरकत नसावी.  ALSO READ : ​पूनम पांडेचा न्यूड फोटो; जाणून घ्या तिचा सिक्रेट प्रोजेक्ट