गॉर्जियस डिप्पी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 21:20 IST
गेल्या वर्षभरात दीपिका पदुकोनने सिद्ध केले आहे की, ती बॉलीवूडमधील सर्वांत पॉवरफुल अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘कॉकटेल’,‘ये जवानी है दिवानी’,‘रामलीला’, ...
गॉर्जियस डिप्पी!
गेल्या वर्षभरात दीपिका पदुकोनने सिद्ध केले आहे की, ती बॉलीवूडमधील सर्वांत पॉवरफुल अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘कॉकटेल’,‘ये जवानी है दिवानी’,‘रामलीला’, ‘हॅप्पी न्यू ईअर’,‘पिकू’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ मधील तिचा अभिनय अतिशय कसदार आणि दाद द्यावा वाटणारा होता. तिने बॉलीवूडमध्ये स्वत:साठी एक वेगळी जागा तयार करून घेतली आहे. तिच्या लुक्सवर देखील प्रत्येक चित्रपटात तिने विशेष लक्ष दिले आहे. डिप्पी सध्या हॉलीवूडमधील डेब्यू चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ‘ट्रिपल एक्स:द रिटर्न आॅफ एक्सझांडर केज’ च्या सेटवरील तिचे पिक्स ती टविटरवर पोस्ट करत असते. चित्रपटात ती लेडी हंटरची भूमिका साकारत आहे. त्यामुळे तिच्या लुक्सवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. हा तिचा नुकताच पोस्ट केलेला फोटो आहे.