Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानच्या मागे पाकिस्तान लागलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 17:59 IST

फार कमी वेळात साराने बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले.

सारा अली खानची ओळख आता फक्त सैफ अली खान व अमृता सिंग यांची मुलगी इथं पर्यंत मर्यादित राहिलेली नाही. बॉलिवूड स्टार अशी आज तिची ओळख आहे. फार कमी वेळात साराने बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले. चंचल, खट्याळ सारा सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते. फनी व्हिडीओ, फोटो असे सगळे ती शेअर करत असते.

 2019 मध्ये गुगलने कडून भारतात सर्वात जास्त सर्च झालेल्या व्यक्तींची यादी जाहिर करण्यात आली होती. त्यानंतर पाकिस्ताननेही त्यांच्या गुगल सर्च इंजिनची यादी प्रसिद्ध केली आहे होती आणि यात साराने  टॉप 10 च्या यादीत स्थान मिळवले आहे होते. साराशिवाय यायादीत भारताचे नागरिकत्त्व स्वीकारलेले गायक अदनान सामीदेखील नाव होते. यावरुन बॉलिवूडप्रमाणे सारा पाकिस्तानमध्ये देखील लोकप्रिय असल्याचे लक्षात येते. 

साराच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे अलीकडे तिचा ‘लव्ह आज कल’ हा सिनेमा रिलीज झाला होता. पण या सिनेमाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. लवकरच सारा वरुण धवनसोबत ‘कुली नंबर 1’ च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. तसेच अक्षय कुमार आणि धनुष यांच्यासोबत ‘अतरंगी रे’ या सिनेमातही ती मुख्य भूमिकेत आहे.

टॅग्स :सारा अली खान