Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका चोप्राच्या घरी पुन्हा एकदा गुड न्यूज, लवकरच येणार नवा पाहुणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 14:40 IST

अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) नुकतीच सरोगसीच्या माध्यमातून आई झाली आहे. आता तिच्या घरी पुन्हा एकदा नवीन पाहुणा येणार आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) नुकतीच सरोगसीच्या माध्यमातून आई झाली आहे. त्यामुळे तिचे चाहते खूप खूश आहेत. दरम्यान आता प्रियंका चोप्राच्या घरी पुन्हा एकदा गुड न्यूज आहे. लवकरच त्यांच्या घरी नवीन पाहुणा येणार आहे. प्रियंका आताच आई झालीय मग पुन्हा नवीन पाहुणा येणार हे वाचल्यावर तुम्ही गोंधळून गेला असाल ना. तर प्रियंका चोप्राची जाऊबाई म्हणजेच हॉलिवूड अभिनेत्री सोफी टर्नर आणि गायक जो जोनास लवकरच दुसऱ्या बाळाचे आई बाबा होणार आहेत. जो आणि सोफीला यापूर्वीही एक मुलगी असून तिचे नाव विला आहे. पहिले बाळ दोन वर्षांचे झाल्यानंतर आता हे जोडपे दुसऱ्या बाळाचे स्वागत करणार आहेत. 

विदेशी मीडियाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जो आणि सोफी आनंदी आहेत की ते लवकरच दुसऱ्या मुलाचे पालक होणार आहेत. दोघांनाही भाऊ-बहीण आहेत, त्यामुळे आपली मुलगी एकुलती एक असावी असे त्याला वाटत नव्हते. अलीकडेच, या जोडप्याने जोचा वाढदिवस आणि प्रेग्नेंसीचा आनंद देखील साजरा केला.

गेल्या महिन्यात सोफी आणि जो एकत्र स्पॉट झाले होते. यादरम्यान सोफी तिच्या कुटुंबासोबत लॉस अँजेलिसला जाताना मॅक्सी ड्रेसमध्ये दिसली. यादरम्यान अभिनेत्रीच्या काही फोटोंमध्ये तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत होता. सोशल मीडियावर सोफीचे हे फोटो समोर येताच तिच्या प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरू झाली.

सोफी आणि जोने २०१६ मध्ये डेट करायला सुरुवात केली, त्यानंतर पुढच्या वर्षी ऑक्टोबर २०१७ मध्ये त्यांनी एंगेजमेंट केली. नंतर मे २०१९ मध्ये, या जोडप्याने लॉस वेगासमध्ये लग्न करून त्यांच्या चाहत्यांना चकित केले होते. त्यांच्या लग्नानंतर, सोफी आणि जो जुलै २०२० मध्ये त्यांच्या पहिल्या बाळाचे पालक झाले.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास