शाहरूख-ऐश्वर्याच्या चाहत्यांसाठी खुशखबर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2016 14:50 IST
बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान याचा आज वाढदिवस. नेमक्या त्याच्या वाढदिवसाच्यादिवशी सिनेप्रेमींना उत्साहित करणारी एक बातमी समोर आली आहे. केवळ ...
शाहरूख-ऐश्वर्याच्या चाहत्यांसाठी खुशखबर!!
बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान याचा आज वाढदिवस. नेमक्या त्याच्या वाढदिवसाच्यादिवशी सिनेप्रेमींना उत्साहित करणारी एक बातमी समोर आली आहे. केवळ शाहरूखच नव्हे तर ऐश्वर्या राय बच्चन हिच्या चाहत्यांसाठीही ही उत्साहवर्धक बातमी आहे. होय, लवकरच शाहरूख व ऐश्वर्या दोघेही आॅनस्क्रीन एकत्र दिसणार असल्याची खबर आहे. अलीकडे ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये ऐश्वर्या व शाहरूख ही जोडी एका फ्रेममध्ये दिसली. ऐश्वर्याच्या पतीच्या भूमिकेत शाहरूख यात दिसला. पण ही भूमिका अगदीच लहान होती. पण तरिही ही जोडी करण जोहरला इतकी आवडली की, त्याने त्याच्या पुढच्या चित्रपटात या दोघांना घेण्याचा निर्णय घेतलायं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरूख व ऐश्वर्याची जोडी ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये कमालीची सुंदर दिसतेय. इतकी की, त्यांना पाहून ‘ऐ दिल है मुश्किल’चा दिग्दर्शक करण जोहर या जोडीच्या अक्षरश: प्रेमात पडला आहे. या जोडीवर अख्खा चित्रपट बनू शकतो, असे करणला वाटू लागले आहे. विशेष म्हणज या दोघांसाठी एक स्क्रिप्टही करणच्या डोक्यात आहे.‘मोहब्बते’नंतर संजय लीला भन्साळी यांच्या २००२ मध्ये आलेल्या ‘देवदास’मध्ये शाहरूख-ऐश्वर्या एकत्र दिसले होते. शिवाय ‘शक्ती’ या चित्रपटातील ‘इश्क कमीना...’ या गाण्यात ही जोडी एकत्र झळकली होती. यानंतर ‘चलते चलते’ या चित्रपटात ही जोडी एकत्र येणार होती. मात्र काही सीन्स शूट केल्यानंतर ऐश्वर्याने हा चित्रपट सोडला होता. ‘चलते चलते’च्या सेटवर जाऊन ऐश्वर्याचा तत्कालीन प्रियकर सलमानने जोरदार धिंगाणा घातला होता. कथितरित्या यामुळेच शाहरूखने ऐश्वर्याला या चित्रपटातून काढून टाकले होते.