रोहित शेट्टीने दिग्दर्शित केलेला 'गोलमाल : फन अनलिमिटेड' २००६ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती. या चित्रपटातील कॉमेडी सीन्स आणि आयकॉन डायलॉग्ज आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. यानंतर चित्रपटाचे चार भाग आले. आता रोहीत शेट्टी 'गोलमाल ५' घेऊन येत आहे. 'गोलमाल ५'चे शुटिंग सध्या वेगात सुरू असून, या भागात जुन्या कलाकारांसोबत बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार याची 'सरप्राईज पॅकेज' म्हणून एन्ट्री झाली आहे. मात्र, यातच अक्षयच्या मानधनाबाबत एकच चर्चा सुरू झाली आहे.
अक्षय कुमार 'गोलमाल ५' या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचे शुटिंग हे केवळ १८ ते २२ दिवसांचे आहे. या काही दिवसांच्या कामासाठी अक्षयला तब्बल ३५ ते ४० कोटी रुपये मानधन दिले जात असल्याची चर्चा रंगली होती. अक्षयचं हे मानधन अजय देवगणपेक्षाही जास्त असल्याचं बोललं जातं होतं. यावर 'रोहित शेट्टी पिक्चर्स'च्या प्रवक्त्यांनी अधिकृत निवेदन जारी करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
निर्मात्यांनी स्पष्ट केले की, "अक्षय कुमारच्या मानधनाबाबत मीडियामध्ये येत असलेले सर्व आकडे पूर्णपणे खोटे, निराधार आणि केवळ तर्क-वितर्कांवर आधारित आहेत". चित्रपटाचे आर्थिक व्यवहार हे अत्यंत गोपनीय असतात आणि ते कधीही सार्वजनिक केले जात नाहीत, असे म्हणत निर्मात्यांनी या अफवा फेटाळून लावल्या आहेत.
Web Summary : Rumors circulated that Akshay Kumar was paid more than Ajay Devgn for 'Golmaal 5'. Producers refuted claims, stating figures were baseless speculation. Financial matters are confidential, they clarified.
Web Summary : 'गोलमाल 5' में अक्षय कुमार को अजय देवगन से ज़्यादा फीस मिलने की अफवाहें थीं। निर्माताओं ने इन दावों को खारिज करते हुए कहा कि आंकड़े निराधार अटकलें हैं। उन्होंने स्पष्ट किया कि वित्तीय मामले गोपनीय हैं।