Join us

गोल्डन ग्लोब २०१७ : प्रियांका चोप्राच्या सौंदर्याचा रेड कार्पेटवर जलवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2017 11:55 IST

७४ वा गोल्डन पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. अशा अवॉर्ड शोमध्ये कोण विजेता ठरतो याबरोबरच रेड कार्पेटवर कोण काय ...

७४ वा गोल्डन पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. अशा अवॉर्ड शोमध्ये कोण विजेता ठरतो याबरोबरच रेड कार्पेटवर कोण काय परिधान करते याकडेदेखील संपूर्ण सिनेचाहत्यांचे लक्ष असते. तमाम भारतीयांसाठी यंदाच्या सोहळ्याचे खास आकर्षण होते ते ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राचे. हॉलीवूडमध्ये आता चांगल्या प्रकारे स्थिरावलेली प्रियांका अशा आंतरराष्ट्रीय कार्यक्र मांमध्ये नेहमीच हजेरी लावते.यावेळी रेड कार्पेटवर तिने डीप नेकलाईन असलेला गोल्डन गाऊन घातलेला होता. गोल्डन ग्लोबमध्ये ती केवळ उपस्थित नव्हती तर तिच्या हस्ते एका पुरस्काराचे वितरणदेखील झाले. टीव्ही विभागातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (ड्रामा) पुरस्कार तिने बिली बॉब थॉर्टनला प्रदान केला. स्टेजवर ती अत्यंत आत्मविश्वासाने वावरत होती.प्रियांकाला असे जागतिक व्यासपीठावर वावरताना पाहून तिच्या चाहत्यांना नक्कीच अभिमान वाटत असेल. बॉलीवूडमध्ये अभिनयाच्या जोरावर तिने यश मिळवलेच आहे; पण आता तेवढ्याच ताकदीने तिने ‘ग्लोबल’ प्रेक्षकांनाही आपलेसे करून घेतले आहे.                                                                         रेड कार्पेट : प्रियांका चोप्रा‘हॉलीवूड फॉरेन प्रेस असोसिएशन’तर्फे देण्यात येणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात ‘ला ला लँड’ या सिनेमाचा बोलबाला राहिला. सात पुरस्कारांसह डेमियन चॅझेल दिग्दर्शित हा चित्रपट यंदाच्या ‘गोल्डन ग्लोब्स’मध्ये सर्वाधिक अवॉर्ड्स जिंकणारी फिल्म ठरली. प्रमुख अभिनेता रायन गोस्लिंग आणि अभिनेत्री एमा स्टोन यांनी त्यांच्या विभागात पुरस्कार जिंकले. त्यासह बेस्ट फिल्म (कॉमेडी/म्युझिकल), दिग्दर्शन, पटकथा, गाणे आणि संगीत या विभागतही ‘ला ला लँड’ सर्वोत्कृष्ट ठरला.बरं अशा प्रकारे अवॉर्ड प्रेजेंट करण्याची तिची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी तिने टीव्हीचा ‘आॅस्कर’ म्हटले जाणाऱ्या ‘एमी अवॉर्ड्स’चेही वितरण केले आहे. तिने ‘हाऊस आॅफ कार्ड्स’ अ‍ॅक्टर केविन स्पेसीला सवोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने नावाजले होते.