आत्मसुरक्षा कॅम्पेनसाठी ‘सोना’ चा पुढाकार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2016 14:54 IST
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही सध्या ‘अकिरा’ मधील तिच्या आगामी चित्रपटासाठी प्रचंड चर्चेत आहे. त्यातील तिचा अॅक्शन लुक ‘बी टाऊन’ ...
आत्मसुरक्षा कॅम्पेनसाठी ‘सोना’ चा पुढाकार!
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही सध्या ‘अकिरा’ मधील तिच्या आगामी चित्रपटासाठी प्रचंड चर्चेत आहे. त्यातील तिचा अॅक्शन लुक ‘बी टाऊन’ मध्ये चर्चेचा मुद्दा बनला आहे. मुंबईत एका कॉलेजमध्ये होणाºया ‘आत्मसुरक्षा कॅम्पेन’ साठी तिने पुढाकार घेतला आहे.ती म्हणते,‘ मला खरंच खुप चांगले वाटत आहे की, सर्व कॉलेजेस आत्मसुरक्षा कॅम्पेनसाठी पुढाकार घेत आहेत. एन.एम.कॉलेज मध्ये आयोजित करण्यात आलेला हा सेल्फ डिफेन्स वर्कशॉप हेच माझ्या चित्रपटाचे यश आहे.’ सोनाक्षीने चित्रपटासाठी मार्शल आर्ट्सचे खास ट्रेनिंग घेतले आहे. विद्यार्थ्यांसाठी सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग प्रोग्राम घेणे ही काळाची गरज बनल्याचे ती सांगते. विशेष टिप्स आणि बेसिक ट्रेनिंग देणे आवश्यक बनले आहे.