Join us
Daily Top 2Weekly Top 5

सासूबार्इंनी बदलवला करिनाचा निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2016 11:53 IST

करिना कपूर लवकरच आई होणार आहे. एकीकडे ती तिची प्रेग्नंसी एन्जॉय करतेय. दुसरीकडे तिच्या प्रेग्नंसीबद्दल वेगवेगळ्या बातम्या ऐकायला येत ...

करिना कपूर लवकरच आई होणार आहे. एकीकडे ती तिची प्रेग्नंसी एन्जॉय करतेय. दुसरीकडे तिच्या प्रेग्नंसीबद्दल वेगवेगळ्या बातम्या ऐकायला येत आहेत. म्हणजेच प्रेग्नंसी कुठे होईल, मुलगा-होईल की मुलगी, बाळाचे नाव काय असेल, इथपासून तर अनेक़ यातील एक बातमी जरा जास्तच चर्चेत आहे. ती म्हणजे बेबोला आपली पहिली डिलीवरी भारतात नाही तर विदेशात करण्याची इच्छा आहे. अर्थात बेबोची ही इच्छा आता पूर्ण होणार नाहीय. होय, सासूबार्इंमुळे बेबोला म्हणे हा निर्णय बदलावा लागला आहे. पुढील महिन्यात बेबोची डिलीवरी होणार आहे. नवाब पटौडी कुटुंबाने बाळाच्या स्वागताची जोरदार तयारी चालवली आहे. त्यातच बेबो आपल्या पहिल्या बाळाला विदेशात जन्म देणार अशी बातमी आली आणि सगळ्यांच्याच भूवया ताणल्या गेल्या. मात्र बेबोच्या सासूबाई अर्थात शर्मिला टागौर यांनी मात्र असे काहीही नसल्याचे स्पष्ट केले. अलीकडे एका अवार्ड फंक्शनला पोहोचल्या शर्मिला प्रथमच सुनेच्या प्रेग्नंसीबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसल्या. आमच्या घरात एक नवा पाहुणा येणार आहे. मी स्वत: यामुळे प्रचंड उत्साहात आहे. आमच्या कुटुंबासाठी हा एक महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे. हा आनंद आम्ही सगळे एकत्र साजरा करू, असे त्या म्हणाल्या. करिनाच्या बेबी शॉवर सेरेमनीबद्दलही त्या बोलल्या. करिनाला बेबी शॉवर सेरेमनी करायची इच्छा आहे वा नाही, मला ठाऊक नाही. मला वाटते ती आपल्या कुटुंबीयांसोबत आणि काही जवळच्या मित्रांसोबत शांततेत वेळ घालवू इच्छिते. बेबी शॉवर सारखे काही मोठे सेलिबे्रशन होईल, असे मला तरी वाटत नाही, असे त्या म्हणाल्या. यानंतर शर्मिला यांना बेबोच्या विदेशात डिलिवरी करण्याच्या निर्णयाबद्दल विचारण्यात आले. यावर त्यांनी ठामपणे नकार दिला. विदेशात डिलिवरी? बिल्कुल नाही. भारतात काय वाईट आहे? इथेच काम करतो, राहतो तर विदेशात डिलिवरी करण्याची गरज काय? असे अनेक सवाल त्यांनी केले. विशेष म्हणजे विदेशात डिलीवरीची बातमी चुकीची आहे, हेही त्यांनी सांगितले. आम्ही इतकेही मुर्ख नाही की इतक्या थंडीत विदेशात जाऊन डिलीवरी करू. येथे आमचे घर आहे. दुसºया देशापेक्षा आपल्या घरात डिलीवरी होणे कधीही चांगले, असेही त्यांनी स्पष्ट केले.