Join us

'गो गोवा गॉन 2' 2021 मध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 16:25 IST

'गो गोवा गॉन' सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सैफ अली खान स्टारर 2013 मध्ये रिलीज झालेल्या गो गोवा गॉन सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गो गोवा गॉन 2 च्या स्क्रिप्टवर काम सुरु झाले आहे. चित्रपट व्यापार विश्लेशक तरण आदर्श यांनी ही माहिती ट्विटरवरुन दिली. 

मार्च 2021मध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. निर्माता दिनेश विजान आणि इरॉस इंटरनॅशनल एकत्र येत या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. सिनेमाची सुरुवात तिथूनच होणार आहे ज्याठिकाणी पहिल्या सिनेमाची कथा संपली होती. 2020 साली हा सिनेमा फ्लॉवरवर येणार आहे. सिनेमाचा सीक्वल हा पहिल्या भागा पेक्षा जास्त इंटरेस्टिंग असणार आहे असे समजतेय. 

2013 मध्ये सैफ अली खानचा हा सिनेमा हीट झाला होता. कुणाल खेमू, आनंद तिवारी आणि सैफच्या या सिनेमाचे दिग्दर्शन राज निदीमोरु आणि कृष्णा डीके या जोडीने केले होते.  

दिनेश विजन सध्या जान्हवी कपूर, राजकुमार राव, वरुण शर्मा आणि पंकज त्रिपाठी स्टारर 'रुही आफजा' सिनेमात बिझी आहे. 

सैफच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर लवकरच त्याचा जवानी जानेमन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तब्बू सैफ अली खानच्या पत्नीची भूमिका साकारत आहे, जरी ती बर्‍याच वर्षांपासून त्याच्यापासून दूर राहत होती. पण त्यांची ओळख करून देण्याची जबाबदारी दोघांची मुलगी घेते. आलिया फर्नीचरवाला या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणार आहे. 

टॅग्स :सैफ अली खान