Join us

​महिमा म्हणते, मी परतणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2016 21:06 IST

होय, महिमा म्हणजे...महिमा चौधरीच...‘परदेश’ चित्रपटामुळे नावारूपास आलेली अभिनेत्री महिमा चौधरी ही चित्रपटसृष्टीत परतण्यास आतूर आहे. बॉलिवूडमध्ये परतण्यास मी प्रचंड ...

होय, महिमा म्हणजे...महिमा चौधरीच...‘परदेश’ चित्रपटामुळे नावारूपास आलेली अभिनेत्री महिमा चौधरी ही चित्रपटसृष्टीत परतण्यास आतूर आहे. बॉलिवूडमध्ये परतण्यास मी प्रचंड आतूर आहे आणि मी लवकरच मी परतेल, असे महिमा म्हणाली. आज एका कार्यक्रमात बोलताना महिमाने हा  आत्मविश्वास बोलून दाखवला. लग्नानंतर आज मी एका मुलीची आई आहे. त्यामुळे काही काळ चित्रपटांत काम करण्याचे मी थांबवले होते. दीर्घकाळात मी एका बंगाली चित्रपटात काम करतेयं. या चित्रपटात मी आईची भूमिका साकारत आहे. लवकरच मी हिंदी चित्रपटांतही काम करणार आहे, असे महिला म्हणाली. आज मातृदिन आहे आणि सध्या मी आई होण्याचा आनंद अनुभवते आहे, हा चांगला योगायोग आहे,असेही ती म्हणाली.