बिप्सच्या वेडिंग आऊटफिटची एक झलक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2016 09:30 IST
बिपाशा बासु आणि करण सिंग ग्रोव्हर हे आता ३० एप्रिलला लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. सर्वांनाच त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली ...
बिप्सच्या वेडिंग आऊटफिटची एक झलक!
बिपाशा बासु आणि करण सिंग ग्रोव्हर हे आता ३० एप्रिलला लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. सर्वांनाच त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे. बिपाशाची स्टायलिस्ट श्यामली अरोरा हिने सांगितले की, ‘बिप्स लग्नाच्यावेळी पारंपारिक बंगाली ड्रेसिंगमध्ये असणार आहे आणि तिच्या फेव्हरेट लाल रंगाचा गोल्डन काठ असलेला ब्राईडल लेहंगा घालणार आहे.नुकताच तिची मैत्रीण आणि फिटनेस ट्रेनर डेनी पांडे हिने इन्स्टाग्रामवर बिप्सच्या लेहंग्याचा फोटो अपलोड केला आहे. तिने त्या फोटोला कॅप्शन दिले आहे की, ‘अॅण्ड इट आॅल बिगिन्स. वॉव...’ तसेही आपल्याला बिपाशाचा ड्रेस बघण्याची खुप इच्छा होतीच.