Join us

​दिया म्हणते, ‘ही नव्हे देशभक्ती’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 14:25 IST

समाजात फुट पाडणे व एकमेकांविषयी द्वेष निर्माण करणे हे देशभक्तांचे काम नाही असे मत अभिनेत्री दिया मिर्झा हिने व्यक्त ...

समाजात फुट पाडणे व एकमेकांविषयी द्वेष निर्माण करणे हे देशभक्तांचे काम नाही असे मत अभिनेत्री दिया मिर्झा हिने व्यक्त केले आहे. तिने ट्विट करून देशाला संघटीत करण्याचा सल्ला दिला आहे. दियाच्या मते द्वेष पसरविणे ही देशभक्ती नाही. उरी येथील लष्करी तळावर झालेला दहशतवादी हल्ल्यानंतर बॉलिवूडमध्ये पाक कलाकारांनी काम करू नये यावर दोन गट पडले आहेत. याचे भांडवल करू नये असे दियाने आपल्या ट्विटपोस्टमधून सुचविले आहे. }}}} ">http://सध्याच्या काळात देशभक्तीचे प्रदर्शन करण्याची चढाओढ लागली आहे. मात्र समाजातील घटकांमध्ये द्वेष निर्माण करणे, दरी निर्माण करणे; ही खरी देशभक्ती नाही. समाजाला, देशाला सशक्त करण्यासाठी संघातीत समाजाची गरज आहे. विघटीत समाज दुर्बल बनतो आणि देशालाही दुर्बल बनवितो. राजकारणी आपल्या मतलबासाठी समाजाला विघटीत करून सत्ता मिळवितात असे दियाने आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.बॉलिवूडमध्ये पाक कलाकारांच्या काम करण्याहून निर्माण झालेला वाद शमताना दिसत नाही. पाकिस्तानी अभिनेता फवाद खान व माहिरा हिने आपले मत व्यक्त केल्यावर दियाच्या या ट्विटची चांगलीच चर्चा होत आहे.