Join us

​‘५० लाख द्या, अन्यथा आलिया भट्टला गोळ्या घालून ठार मारू’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2017 11:05 IST

चित्रपट निर्माते व  दिग्दर्शक महेश भट्ट, त्यांची पत्नी सोनी  राजदान आणि मुलगी आलिया भट्ट अशा तिघांना एका अज्ञात व्यक्तिने ...

चित्रपट निर्माते व  दिग्दर्शक महेश भट्ट, त्यांची पत्नी सोनी  राजदान आणि मुलगी आलिया भट्ट अशा तिघांना एका अज्ञात व्यक्तिने जीवे मारण्याची धमकी देत, ५० लाख रूपयांच्या खंडणीची मागणी केली.  ५० लाख रुपए द्या, अन्यथा तुम्हा तिघांना गोळ्या घालून ठार मारू, अशी धमकी  या व्यक्तिने दिली होती.दरम्यान धमकी देणाºया या अज्ञात व्यक्तिला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहेत. त्याचा फोन ट्रेस करून या प्रकरणाचा खुलासा करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. महेश भट्ट यांनी स्वत: twitterवरून या प्रकरणाची माहिती दिली. सुरूवातीला भट्ट कुटुंबाने या धमकीच्या फोनला गांभीर्याने घेतले नाही. कुणीतरी टवाळकी करत असणार, म्हणून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र या इसमाने व्हॉट्सअ‍ॅप मॅसेज आल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून महेश भट्ट यांनी पोलिसांकडे धाव घेतली. माझ्या धमकीला मस्करी समजण्याची चूक करू नका असे धमकी देणाºया इसमाने व्हॉट्स अ‍ॅप संदेशात म्हटले होते. तसेच, पैसे न दिल्यास मुलगी आलिया आणि पत्नी सोनी राजदान यांना गोळ्या घालून मारण्याची धमकी दिली होती. लखनौच्या एका बँकेत हे पैसे जमा करण्यास सांगण्यात आले होते.यानंतर त्या अज्ञात व्यक्तिने असेच धमकीचे आणखी काही मॅसेजेस पाठवले.   त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी लगेच शोध घेतला आणि फोन ट्रेस करून धमकी देणा-या व्यक्तिला उत्तर प्रदेश येथून अटक केली. एका न्यूज चॅनेलशी बोलताना महेश भट्ट यांनी याप्रकरणावर दु:ख व्यक्त केले.   आम्हाला सेलिब्रिटी असल्याची कीमत चुकवावी लागते, असे ते खेदाने म्हणाले.