Join us

प्रियंकावर गिफ्ट्सचा वर्षाव...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 09:41 IST

 नुकताच प्रियंका चोप्रा हिचा ३४ वा वाढदिवस साजरा झाला. यूएसमध्ये ‘क्वांटिको’ च्या टीमने रात्री १२ वाजता केक कट करून ...

 नुकताच प्रियंका चोप्रा हिचा ३४ वा वाढदिवस साजरा झाला. यूएसमध्ये ‘क्वांटिको’ च्या टीमने रात्री १२ वाजता केक कट करून तिचा बर्थडे सेलिब्रेट केला. सोशल मीडियावरही तिला चाहत्यांच्या अनेक शुभेच्छा मिळाल्या. तिने तिच्या खास  स्टाईलमध्ये सर्व चाहत्यांचे आभार मानले.तिला जवळचे, मित्रमंडळी आणि नातेवाईकांकडून शुभेच्छांसह अनेक गिफ्टस मिळाले. तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो अपलोड केला आहे. ज्यात  तिच्या रूममध्ये सर्व गिफ्टस ठेवण्यात आलेले आहेत.त्या गिफ्टसच्या शेजारी ती बसलेली दिसत आहे. तिने अपलोड केलेल्या या फोटोला तिने कॅप्शन दिले आहे की,‘ फिल्स लाईक क्रिसमस मॉर्निंग..बट इट्स बर्थडे नाईट. थँक यू आॅल फॉर द थॉटफुल प्रेझेंट्स गेश्चर अ‍ॅण्ड मेसेजेस. आय फिल व्हेरी लव्ह्ड...आफ्टर १६ डे आॅन सेट आय फिल सो ब्लेस्ड...