Join us

होणार सुनेच्या बर्थ डे ला रणवीरच्या आई-बाबांनी दिले 'हे' महागडे गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 14:35 IST

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण आपले व्हेकेशन मालदीवमध्ये एन्जॉय करुन भारतात परतले आहेत. अनेक दिवसांपासून दोघे डिप्पीच्या ...

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण आपले व्हेकेशन मालदीवमध्ये एन्जॉय करुन भारतात परतले आहेत. अनेक दिवसांपासून दोघे डिप्पीच्या बर्थ डेला साखरपुडा करणार असल्याची चर्चा होती. मात्र असे काही झाले नाही ते साखरपुडा न करताच परतले आहेत. मात्र मुंबई एअरपोर्टवर ज्यावेळी दोघे स्पॉट झाले तेव्हा स्वारी खुशीत दिसत होती. सूत्रांच्या माहितीनुसार दोघांच्या घरी लग्नाची जय्यत तयारी सुरु आहे आणि लवकरच दोघे लग्न करणार आहेत. दीपिका पादुकोणच्या घरी रणवीरच्या घरातून खूप सारे गिफ्ट्स आले आहेत. ज्यामुळे दीपिकाची कळी जास्त खुलली आहे. 'स्पॉटब्वॉय'च्या रिपोर्टनुसार दीपिका पादुकोणच्या बर्थ डे निमित्त रणवीर सिंगच्या फॅमिलीने आपल्या होणाऱ्या सूनबाईंना एक महागडा डायमंडचा सेट आणि सब्यसाची डिझायन केलेली सारी गिफ्ट केली आहे. ज्यानंतर दोघांच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आले आहे.  दीपिकाचे बाबा प्रकाश पादुकोण यांनी रणवीर सिंगसोबतचे तिचे नातं कधीच स्वीकार केले आहे. एका इंटरव्ह्रु दरम्यान ते म्हणाले होते की, ''वडिल होण्याचा नात्याने मी दीपिकाला तिचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र दिले आहे. लग्नाच्या बाबतीत ही तिला जे योग्य वाटेल ते ती करु शकते.'' काही दिवसांपूर्वी दीपिकाचे वडिल आणि रणवीर सिंग यांचा फोटो व्हायरल झाला होता.  ALSO RAED :  साखरपुडा न करताच परतले दीपिका-रणवीर, पाहा फोटो!गेल्या चार वर्षांपेक्षा जास्त काळ दोघे रिलेशनशीपमध्ये आहेत. अनेक वेळा दोघांच्या ब्रेकअपची चर्चा देखील होते. रणवीरला लग्नाची घाई होती. मात्र दीपिकाला सध्या करिअरवर लक्षकेंद्रीत करायचे होते. त्यामुळे ती लग्नाला तयार नसल्याची चर्चा अनेक वेळा झाली. आता मात्र दोघांच्या घरी सनई चौघडे वाजायची सुरुवात झाली आहे. गलियों की रासलीला रामलीलाच्या शूटिंग दरम्यान दोघांमधले प्रेम खुलले. दोघांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री आणि ऑफस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. लवकरच दोघांचा संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात रणवीरच्या भूमिकेला नेगेटीव्ह शे़ड आहे. तर दीपिका राणीच्या भूमिकेत दिसणार आहे.