Join us

जेनेलिया छोट्या पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 06:10 IST

२0 १२ मध्ये रितेश देशमुखशी लग्न केल्यानंतर अभिनेत्री जेनेलिया डिसुजा मोठय़ा पडद्यापासून दूरच होती. मागच्या वर्षी मुलाला जन्म दिल्यानंतर ...

२0 १२ मध्ये रितेश देशमुखशी लग्न केल्यानंतर अभिनेत्री जेनेलिया डिसुजा मोठय़ा पडद्यापासून दूरच होती. मागच्या वर्षी मुलाला जन्म दिल्यानंतर एक मोठा ब्रेक घेऊन जेनेलिया छोट्या पडद्याच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिने सांगितले की, प्रेग्नन्सी नंतर तिचा चेहरा आणि स्कीन खूप डल झाली होती. तिने तर आरशात पाहणेच बंद केले होते. टीव्हीवर सुरू होणार्‍या या व्यावसायिक कार्यक्रमात जेनेलियासोबत कल्कि कोचलिनही दिसेल आणि बाळ झाल्यानंतर आयुष्यातली प्रत्येक गोष्ट कशी बदलते, याबाबत जेनेलिया सांगेल.