Join us

जेनेलियाने दिली मला जबाबदारीची जाणीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 13:59 IST

 बॉलीवूडमधील सर्वांत क्युट कपल्सपैकी एक म्हणून रितेश आणि जेनेलिया देशमुख यांच्याकडे पाहिले जाते. ते रिआन आणि राहिल या दोन ...

 बॉलीवूडमधील सर्वांत क्युट कपल्सपैकी एक म्हणून रितेश आणि जेनेलिया देशमुख यांच्याकडे पाहिले जाते. ते रिआन आणि राहिल या दोन गोंडस मुलांचे पालक झाले आहेत. लग्न आणि पालकत्व या प्रवासाविषयी बोलताना रितेश म्हणाला,‘ मी वयाच्या १८ व्या वर्षी जेनेलियाला डेटवर नेण्यास सुरूवात केली. आम्ही एकत्र पहिला चित्रपट केला तेव्हा तिने खुप कष्ट घेतले होते.सकाळी हैदराबादेत शूट, नंतर मुंबईला येऊन तिच्या परीक्षा देत असायची. आणि मग पुन्हा एकदा सेटवर ती तयार असायची. कलाकारासोबतच ती एक आई म्हणून फारच जबाबदार आहे. खरंतर तिनेच मला एक चांगला वडील बनवले. प्रत्येक वडीलांप्रमाणे मी देखील तेच करतो जे करायला हवे. मुलांना शाळेत सोडणं, त्यांचे डायपर्स बदलणं, हे सर्व मी करायला शिकलो.वेल, खरंतर हे करायला कोणत्या वडीलांना आवडणार नाही. आम्ही आमच्या मुलांसोबत आई-बाबा म्हणून नव्हे तर मित्र-मैत्रिणींप्रमाणेच राहणार आहोत. त्यांना आम्ही त्यांच्या दुरचे नव्हे तर जवळचे वाटायला हवेत. ’