Join us

VIDEO: थोडक्यात वाचली जिनिलिया, कारमध्ये बसत असताना ड्रायव्हरकडून नकळत झाली चूक अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 10:06 IST

महाराष्ट्राची लाडकी वहिणी जिनिलिया देशमुख नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

Genelia Deshmukh Car Video Viral: रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडपे आहे. रितेश देशमुख आणि जिनिलिया यांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. महाराष्ट्राची लाडकी वहिणी जिनिलिया देशमुख नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. गोड चेहरा आणि मोहक हास्य अशी तिची ओळखच आहे. जिनिलियाच्या बाबतीत असणारी आणखी एक गोष्ट म्हणजे तिचा नम्रपणा. अलिकडेच पुन्हा एकदा तिच्या या गुणांचं दर्शन चाहत्यांना झालं आहे.

जिनिलिया हिचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती कारमधून पडता पडता वाचल्याचं दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसतं की कारचा दरवाजा उघडाच असताना ड्रायव्हरकडून नकळत चूक झाली. जिनिलियानं कारचा दरवाजा उघडला असताना ड्रायव्हरने गाडी सुरू केली. जिनिलियानं मुलांना कारमध्ये बसवलं आणि ती बसणार तेवढ्यात ड्रायव्हरनं कार सुरु केली. जेनेलिया कारमधून पडू शकली असती परंतु तिने प्रसंगावधान राखत स्वत:ला सावरलं.

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक नेटकरी जिनिलियाच्या संयमाचं आणि साधेपणाचं भरभरून कौतुक करत आहेत. काहींनी कमेंट करत म्हटलंय की, "दुसरी एखादी अभिनेत्री असती, तर कदाचित ड्रायव्हरवर ओरडली असती". मात्र जिनिलियाने शांतपणे प्रतिक्रिया दिल्यानं तिच्या स्वभावाचे कौतुक होत आहे. जिनिलियाचा हा साधेपणा आणि नम्रता पाहून चाहते पुन्हा तिच्या प्रेमात पडलेत.

जिनिलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती 'सितारे जमीन पर' (Sitaare Zameen Par) या सिनेमात आमिर खानसोबत  (Aamir Khan)झळकणार आहे. हा सिनेमा २० जूनला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. याशिवाय रितेश देशमुख हा 'राजा शिवाजी' सिनेमा घेऊन येत आहे. या सिनेमात  रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. रितेशसोबतच जिनिलीयादेखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.  'राजा शिवाजी' सिनेमा १ मे २०२६ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.