Join us
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video : भलामोठा गाऊन सांभाळतांना जेनेलियाच्या आले नाकीनऊ, टीम आली धावून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 16:08 IST

असले बकवास कपडे घालताच का? लोकांनी केले ट्रोल

ठळक मुद्देअभिनेता रितेश देशमुखची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया डिसुजा लग्नानंतर फिल्मी करिअर सोडून संसारात रमली. पाठोपाठ मुलांच्या संगोपणात बिझी झाली.

रितेश देशमुखची लाडकी ‘बायकू’ जेनेलिया डिसूजा सध्या जाम चर्चेत आहे. कारण काय तर तिचा भलामोठा गाऊन. होय, असा गाऊन जो सांभाळण्यासाठी तिला चक्क 4  लोकांची मदत घ्यावी लागली. जेनेलिया आणि तिच्या या गाऊनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. फोटोग्राफर वीरल भयानीने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टावर शेअर केला आहे. व्हिडीओ आहे, एका शूटचा.  जेनेलिया ख्रिसमसच्या एका शूटसाठी तयार झाली असून तिने मोठा घेर असलेला पांढ-या रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला आहे. या गाऊनमध्ये जेनेलिया कमालीची सुंदर दिसली. पण तो सांभाळताना तिच्या नाकीनऊ आले. अगदी तो घालून एक पाऊलही तिला टाकता येईना. मग काय, हा गाऊन सांभाळण्यासाठी तिची टीम पुढे आली आणि  टीमच्या मदतीने जेनेलियाने वेळ कशीबशी निभवून नेली. 

जेनेलियाच्या या गाऊनवरून नंतर ती ट्रोलही झाली. ज्यात चालताही येत नाही, असे विचित्र ड्रेस घालताच का? ड्रेस सावरायला चार नोकर लागत असतील, तर त्याचा काय फायदा, अशा काय काय प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्यात. एका युजर  तर यावरून जेनेलियाची खिल्ली उडवताना दिसला. कितना स्ट्रगल करना पडता है इनको, अशा शब्दांत त्याने जेनेलियाच्या या ड्रेसची खिल्ली उडवली.

अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया डिसुजा लग्नानंतर फिल्मी करिअर सोडून संसारात रमली. पाठोपाठ मुलांच्या संगोपणात बिझी झाली. पण आता वहिनीसाहेब पुन्हा एकदा कमबॅकसाठी सज्ज आहेत. होय, आता जेनेलियाला पुन्हा एकदा अभिनय खुणावू लागला आहे. बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा काम करण्याची इच्छा तिने अलीकडे व्यक्त केली होती. ‘कुटुंबासोबत वेळ घालवताना मी सोबत सोबत कॅमेराही मिस करतेय. कदाचित आता ती वेळ आलीय. मी लाइफ सेटल करताना प्रत्येक गोष्टीबाबत क्लिअर होते. पती रितेश देशमुख आणि रियान व राहिल यांच्यासोबत वेळ घालवायचा होता. त्यांच्यासोबत राहायचे होते. सेटवर लहान मुलांबद्दल विचार करून मला ताण घ्यायचा नव्हता. काम करताना अन्य कोणताही विचार मनात येता कामा नये, असे मला वाटायचे. आता मुलं ब-यापैकी मोठी झाली आहेत. आता मी नि:संकोच कामावर परतू शकते,’ असे ती म्हणाली होती.

 

टॅग्स :जेनेलिया डिसूजा