Genelia Deshmukh On Ved 2: महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी अर्थातच अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख. मनोरंजन विश्वातील आदर्श जोडी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. या दोघांची केमेस्ट्री अनेकांना आवडते. त्यामुळेच रितेश आणि जिनिलियाला मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. रितेश देशमुख व जिनिलिया देशमुखचा 'वेड' (Genelia Riteish Deshmukh Ved 2) हा मराठी चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला भरभरुन प्रेम मिळालं होतं. सत्या आणि श्रावणीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्यामुळे या चित्रपटाचा दुसरा भाग येणार का हा प्रश्न चाहते विचारताना दिसून येतात. नुकतंच जिनिलिया देशमुखने 'वेड २'बद्दल खुलासा केलाय.
जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh Confirmed Ved 2) अलिकडेच 'मिरर'ला दिलेल्या मुलाखतीत 'वेड' चित्रपटाचा दुसरा भाग येणार की नाही, याबाबत स्पष्टपणे उत्तर दिलं आहे. ती म्हणाली, "वेड २ ठरलेलंच आहे. त्यावर सध्या काम सुरू आहे. मात्र, त्यासाठी थोडा वेळ लागेल, कदाचित एक किंवा दोन वर्ष". तिने हेही स्पष्ट केलं की सध्या ती आणि रितेश दोघंही त्यांच्या वैयक्तिक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहेत. मात्र वेळ मिळाल्यावर ते पुन्हा एकत्र काम करणार असल्याचंही तिने सांगितलं.
जिनिलिया पुढे म्हणाली की, "वेड हा चित्रपट प्रेक्षकांच्याच नव्हे तर आमची मुलं रिआन आणि राहील यांनाही खूप आवडतो". जिनिलियाने सांगितलं की, रिआन आणि राहील यांना 'वेड' आणि 'धमाल' हे चित्रपट दाखवलेत. तसेच नुकताच प्रदर्शित झालेला 'सितारे जमीन पर'सुद्धा दाखवला आहे. "'सितारे जमीन पर' हा चित्रपट खूप संवेदनशील असल्यामुळे मी तो त्यांना मुद्दाम दाखवला" असंही तिनं नमूद केलं.
'वेड' हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं होत. जिनिलिया देशमुखनेही या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी २ कोटी २५ लाख रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर पहिल्या आठवड्यात २०.६७ कोटींचा गल्ला जमवला होता. तर एकूण कमाई ७५ कोटींच्या घरात गेली होती. दरम्यान, जिनिलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती 'सितारे जमीन पर'नंतर लवकरच 'गनमास्टर G9' या चित्रपटात अभिनेता इमरान हाश्मीसोबत दिसणार आहे. तर रितेश देशमुख लवकरच 'राजा शिवाजी' या ऐतिहासिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर