Join us

रितेशच्या मुलांनी मीडियाचे कॅमेरे पाहाताच केली ही गोष्टी, नेटिझन्स करत आहेत कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 09:59 IST

रितेश आणि जेनेलियाच्या मुलांचीच सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

ठळक मुद्देप्रसारमाध्यमांचे कॅमेरे पाहाताच त्यांनी दोघांनीही हात जोडत सगळ्यांना अभिवादन केले. त्यांची ही गोष्ट नेटिझन्सना प्रचंड आवडली.

बी-टाऊन असो किंवा मग सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी स्टार किड्सची जोरदार चर्चा ऐकायला मिळते. आपल्या पालकांपेक्षा हम भी कुछ कम नहीं असं दाखवून देणारे अनेक स्टार किड्स सध्या चर्चेत आहेत. जान्हवी कपूर, सुहाना खान, अनन्या पांडे, आर्यन खान असे स्टार कीड सध्या जोरदार चर्चेत आहेत. या स्टार किड्सचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत असतात. स्टारकिड्सच्या यादीत आघाडीवर आहे करिनाचा लेक तैमूर अली खान. तो तर माध्यमांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसोझा देशमुख यांना दोन मुले आहेत. त्यांच्या मुलांचे फोटो ते अनेकवेळा त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर शेअर करत असतात. पण त्या दोघांनाही खूपच कमी वेळा प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे. रितेश आणि जेनेलियाला दोन्ही मुलांसोबत मुंबईतील एका हॉटेलच्या बाहेर नुकतेच पाहाण्यात आले. यावेळी रितेशनच्या दोन्ही मुलांचे अंदाज पाहाण्यासारखे होते. प्रसारमाध्यमांचे कॅमेरे पाहाताच त्यांनी दोघांनीही हात जोडत सगळ्यांना अभिवादन केले. त्यांची ही गोष्ट नेटिझन्सना प्रचंड आवडली.

रितेश आणि जेनेलियाने त्यांच्या मुलांना दिलेल्या संस्काराचे नेटिझन्सकडून कौतुक होत आहे. काही नेटिझन्सने तर कमेंट केली आहे की, या मुलांच्या वागाण्यातून आतापासून कळत आहे की, ही मुले आपल्या आजोबांप्रमाणे राजकारणात जाऊन आपले नाव कमावतील.  

जेनेलिया आणि रितेशच्या प्रेमप्रकरणाला तुझे मेरी कसम या चित्रपटाच्या चित्रीकरणापासूनच सुरुवात झाली. या चित्रपटाचे चित्रीकरण हैद्राबादमध्ये सुरू असल्याने या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्यांनी एकमेकांसोबत खूप वेळ घालवला होता. चित्रीकरण संपल्यावर मुंबईत परतल्यावर ते दोघे एकमेकांना मिस करू लागले. एकमेकांना भेटण्याची ते संधीच शोधत असत. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले हे त्या दोघांना देखील कळले नव्हते. अनेक वर्षांच्या अफेअरनंतर त्यांनी लग्न केले. दोन्ही मुलांच्या जन्मानंतर जेनेलियाने चित्रपटसृष्टीपासून दूर राहाणेच पसंत केले आहे. 

टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजा