Join us

देशमुखांच्या घरी नाताळची तयारी; रितेशनं मुलांसह सजवला ख्रिसमस ट्री! जिनिलीयाने शेअर केला Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 14:20 IST

महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी अर्थातच अभिनेता रितेश देशमुख आणि जिनीलिया यांच्या घरीदेखील ख्रिसमसची जोरदार तयारी सुरू झालेली आहे.

Genelia And Riteish Deshmukh Christmas  : ख्रिश्चन बांधवांचा सण म्हणजेच 'नाताळ' अवघ्या काही दिवसांवर आला आहे. 25 डिसेंबरला संपूर्ण जगात नाताळ सण साजरा केला जातो.  आपले लाडके बॉलिवूड सेलिब्रिटींदेखील मोठ्या उत्साहात ख्रिसमस सेलिब्रेश करतात. बॉलिवूडमधील पॉवर कपल आणि महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी अर्थातच अभिनेता रितेश देशमुख आणि जिनीलिया यांच्या घरीदेखील ख्रिसमस सेलिब्रेशनची जोरदार तयारी सुरू झालेली आहे.

रितेश हा मराठी असाला तरी जिनिलिया ही ख्रिश्चन आहे. त्यामुळे दरवर्षी देशमुखांच्या घरी ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा होतो. यंदाही रितेश आणि जिनिलीयाच्या घरी उत्साहाचं वातावरण आहे.  सोशल मीडियावर अभिनेत्री जिनिलिया देशमुखने याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये रितेश हा त्याच्या दोन्ही मुलांसोबत ख्रिसमस ट्री सजवत असल्याचं पाहायला मिळतंय. 

रितेश-जिनिलीयाला रियान आणि राहील अशी दोन मुलं आहेत. यावेळी रियान आणि राहील दोघेही उत्साही असल्याचं दिसलं. नाताळात उंचच उंच आणि वेगवेगळ्या पद्धतीनं सजवलेले ख्रिसमस ट्री हे सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय असतात.  रियान आणि राहील यांनी ख्रिसमससाठी सुंदर असा ख्रिसमस ट्री सजवला. दरम्यान, रितेश-जिनिलियाच्या मुलांच्या संस्काराची कायमच नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगते. रियान आणि राहीलवर या दाम्पत्याने चांगले संस्कार केले आहेत, याची प्रचिती अनेकदा येते. सध्या देशमुख कुटुंबांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजानाताळ