दरम्यान, यामीची बहीण सुरीली राजकुमार संतोषीच्या ‘बॅटल आॅफ सारागढी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करीत आहे. तर यामीविषयी सांगायचे झाल्यास सध्या ती शाहिद कपूरसोबत ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या व्यतिरिक्त उरी अटॅकवर आधारी ‘उडी’मध्येही काम करीत आहे. यासाठी यामीने मेकओव्हर करताना तिचे लांब केसही कापले आहेत. यामी अखेरीस हृतिक रोशनच्या ‘काबिल’ या चित्रपटात बघावयास मिळाली होती.}}}} ">.@yamigautam's sister @surilieggautam denied entry in a well known restaurant in #Serbia#YamiGautampic.twitter.com/JJfPvUtmHz— BollywoodLife (@bollywood_life) June 7, 2018
जीन्स न घातल्यामुळे यामी गौतमच्या बहिणीला रेस्टॉरंटमधून काढले बाहेर, व्हिडीओ व्हायरल !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2018 18:33 IST
अभिनेत्री यामी गौतमची बहीण सुरीलीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती सांगत आहे की, ...
जीन्स न घातल्यामुळे यामी गौतमच्या बहिणीला रेस्टॉरंटमधून काढले बाहेर, व्हिडीओ व्हायरल !
अभिनेत्री यामी गौतमची बहीण सुरीलीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती सांगत आहे की, ‘पॅण्ट न घातल्यामुळे रेस्टॉरंटवाल्यांनी मला बाहेर काढले आहे. सध्या सुरीली यामीसोबत सार्बिया येथे आहे. यामी याठिकाणी शूटिंगसाठी गेली आहे. याचदरम्यान सुरीलीचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती कुठल्यातरी रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर मिळालेल्या वाईट अनुभवाविषयी सांगताना दिसत आहे. यामीने तिचा हा व्हिडीओ शूट करून तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्याठिकाणी सुरीली गेली होती ते सार्बियाचे अतिशय प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे. व्हिडीओमध्ये दोन्ही बहिणी बोलत आहेत. यामी सुरीलीला विचारते की, मिस, तू या बारमध्ये का बसली आहेस? तू रेस्टॉरंटमध्ये का गेली नाहीस ? यावर सुरीली म्हणतेय की, ‘कारण मी जीन्स घातली नसल्यामुळे त्यांनी मला बाहेर काढले आहे.