Join us

​गौतम रोडे व पंखुरी अवस्थी अखेर ‘एन्गेज’ ; जाणून घ्या कधी होणार लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 13:24 IST

टीव्ही जगतातील लोकप्रीय अभिनेता गौतम रोडे आणि अभिनेत्री पंखुरी अवस्थी यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय,आत्तापर्यंत लोकांसमोर आपले ...

टीव्ही जगतातील लोकप्रीय अभिनेता गौतम रोडे आणि अभिनेत्री पंखुरी अवस्थी यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय,आत्तापर्यंत लोकांसमोर आपले नाते मान्य न करणाºया या कपलने साखरपुडा उरकला आहे. आज दोघांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर गौतम व पंखुरी यांचा साखरपुडा पार पडला. पुढील वर्षी दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत.‘सूर्यपुत्र कर्ण’ या मालिकेच्या सेटवर गौतम व पंखुरी या दोघांची ओळख झाली होती. पुढे मैत्री झाली आणि यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पण दोघांनीही हे प्रेम जगापासून लपवून ठेवले. काही जवळचे मित्र आणि कुटुंबीय यांच्याशिवाय कुणालाच या प्रेमाची खबर नव्हती. नाही म्हणायला मीडियाला याची कुणकुण लागली होती. पण गौतम व पंखुरी दोघांनीही प्रत्येकवेळी असे काही नाहीच, असे सांगून वेळ मारून नेली होती. पण आता दोघांनीही आपले नाते आॅफिशिअली मान्य केले आहे. कुटुंबीयाच्या उपस्थितीत गौतम व पंखुरी या दोघांचा ‘रोका’ झाला. साखरपुडा झाल्याची बातमी खुद्द गौतमनेच चाहत्यांना दिली. होय, मी व पंखुरी आमचा दोघांचा नुकताच साखरपुडा झाला. मी खूप नशिबवान आहे की, मला पंखुरीसारखी लाईफ पार्टनर मिळाली. ती माझ्या कुटुंबाचा भाग बनून गेली आहे, असे गौतमने सांगितले. पंखुरीनेही गौतमच्या सूरात सूर मिसळत, आनंद व्यक्त केला. गौतम माझ्या प्रत्येक स्वप्नाचे उत्तर आहे. मी माझ्या आयुष्य त्या सर्वाधिक महत्त्वपूर्ण क्षणांची प्रतीक्षा करतेय. आमचे कुटुंब मिळून लग्नाची तारीख ठरवेल, असे तिने सांगितले.गौतम व पंखुरी यांच्या वयात बरेच अंतर असल्याचे बोलले जात आहे. गौतमचे वय जिथे ४० सांगितले जातेय, तिचे पंखुरी केवळ विशीची असल्याचे म्हटले जातेय. गौतमने सर्वात आधी पंखुरीला प्रपोज केले होते. पंखुरीनेही लगेच गौतमला होकार दिला होता. अलीकडे पंखुरी गौतमच्या घराजवळ शिफ्ट झाली होती. गौतम व पंखुरी दोघेही दिल्लीचे राहणारे आहेत. पंखुरीला कविता आवडतात तर गौतमला फिटनेसचे वेड आहे.