Join us

​दुबईत काय करतेय गौरी खान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 16:54 IST

गौरी खान सध्या तिच्या  इंटीरियर डिझाईनच्या व्यवसायात पूर्णपणे गढून गेलीय. अलीकडे गौरीने रणबीर कपूरचे नवे घर सजवले. खुद्द ऋषी ...

गौरी खान सध्या तिच्या  इंटीरियर डिझाईनच्या व्यवसायात पूर्णपणे गढून गेलीय. अलीकडे गौरीने रणबीर कपूरचे नवे घर सजवले. खुद्द ऋषी कपूर यांनी आपल्या मुलाच्या अर्थात रणबीरच्या नव्या घराच्या इंटीरियरची जबाबदारी गौरीवर सोपवली होती. गौरीने ही जबाबदारी अगदी उत्कृष्ट पार पाडली. तिने रणबीरचे घर इतके सुंदर सजवले की, ऋषी कपूर आणि नीतू कपूर जाम खूश झाले. ऋषी कपूर यांनी तर लगेच गौरीचे कौतुकही केले. अद्भूत वास्तू, गौरी खान, तू घर कमालीचे सुंदर सजवलेस, अशा शब्दांत त्यांनी गौरीचे आभार मानले होते. यानंतर गोव्याच्या एका हॉटेलच्या  इंटीरियरचे कामही गौरी केले. पण सध्या म्हणाल तर गौरी खान दुबईत असावी. होय, तिचा ताजा फोटो तरी हेच सांगतोय. दुबईत शाहरूख आणि गौरीचा अलिशान बंगला आहे. या बंगल्यासमोरचा एक स्टाईलिश फोटो गौरीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.तिने डिझाईन केलेल्या इंटीरियरचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून गौरीने हा फोटो शेअर केला आहे. दुबईतील या बंगल्याचे फोटोशूट अलीकडे पार पडले. यादरम्यानचा एक फोटो गौरीने पोस्ट केला आहे. शिवाय त्यास ‘Photoshoot in our home .. Dubai @palm jumeira. Doorway , gateway having a curved head... An archway. My favourite design element @gaurikhandesigns’ असे कॅप्शन दिले आहे.या फोटोत गौरीने काळ्या रंगाचे टॉप आणि रिप्ड जीन्समध्ये अतिशय स्टाईलिश अवतारात दिसतेय. गौरी आणि तिच्या बंगल्याचा हा फोटो एकदम झकास म्हणायला हवा.   गौरीच्या दुबईतील बंगल्याचे काही इनसाईड फोटोही आम्ही तुमच्यासाठी घेऊ आलो आहोत. तुम्ही बघा...स्टाईलिश गौरीचा लॅविश बंगला...