Join us
Daily Top 2Weekly Top 5

न्यूड पेंटिंग शेअर करणाऱ्या गौरी खानला यूजर्सनी सुनावले खडे बोल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 20:09 IST

बॉलिवूड किंग शाहरूख खानची पत्नी गौरी खान हिला बॉलिवूडमध्ये एखाद्या स्टारप्रमाणे ओळखले जाते. कारण इंडस्ट्रीत तिने स्वत:ची एक वेगळीच ...

बॉलिवूड किंग शाहरूख खानची पत्नी गौरी खान हिला बॉलिवूडमध्ये एखाद्या स्टारप्रमाणे ओळखले जाते. कारण इंडस्ट्रीत तिने स्वत:ची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. पेशाने इंटिरियर डिझायनर असलेली गौरी सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असते. नेहमीच आपले कलात्मक डिझाइन ती सोशल मीडियावर शेअर करीत असते. मात्र यावेळेस तिने एक अशी डिझाइन शेअर केली, ज्यामुळे यूजर्सनी तिच्यावर अक्षरश: हल्लाबोल केला. गौरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला. या फोटोमुळे तिला यूजर्सचा चांगलाच संताप सहन करावा लागला. गौरीने शेअर केलेला हा फोटो एक न्यूड पेंटिंग असून, त्याच्या कॅप्शनमध्ये तिने ब्लॅक ड्रामा असे म्हटले. गौरीने हा फोटो पोस्ट करताचा यूजर्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. यूजर्सनी तिला विचित्र स्वरूपाचे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. एका यूजरने तर या पेटिंगमध्ये शाहरूखला का समाविष्ट केले नाही? असा तिला प्रश्न केला. तर आणखी एकाने शाहरूखला प्रश्न विचारताना लिहिले की, ‘तुझ्या पत्नीने दारू प्राशन केली काय?’दरम्यान, गौरीने शेअर केलेली पेंटिंग इटली येथील प्रसिद्ध आर्टिस्ट रोबर्टो फेरिस  यांनी पेंट केली आहे. पेंटिंगमध्ये तीन लोक बघावयास मिळत असून, तिघेही नग्न आहेत. हे पेंटिंग पूर्णपणे न्यूड आहे. एका यूजरने गौरीच्या या पोस्टला कॉमेण्ट देताना लिहिले की, असे फोटो बघून तुझ्या मुला-मुलीवर काय परिणाम होणार? एका यूजरने तर गौरी ही खूप वाईट आई आहे असे म्हटले आहे.