'धुरंधर' सिनेमात आलम भाईच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता गौरव गेराला सुरुवातीला कोणीच ओळखलं नाही. 'जस्सी जैसी कोई नही'मधला हा तोच नंदू आहे सर्वांना नंतर कळालं. गौरव गेरावर प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केलं. त्याच्या या भूमिकेला चांगलाच प्रतिसाद मिळतोय. नुकतंच गौरवने 'धुरंधर'च्या ऑडिशनचा किस्सा सांगितला. ऑडिशनमध्ये त्याने कोणता सीन केला याचाही खुलासा केला.
गौरव गेराने सिनेमात आलम भाईची भूमिका निभावली आहे जो पाकिस्तानच्या लियारीमध्ये ज्युसचं दुकान चालवतो. खरं तर तो भारताचा गुप्तहेर असतो. आपल्या या भूमिकेबद्दल हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना तो म्हणाला, "मला कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडाने ऑफिसमध्ये बोलवलं होतं. ऑडिशनसाठी मला धुरंधर २ मध्ये असलेला सर्वात इंटेन्स सीन करुन दाखवायला सांगितलं. हा तोच सीन होता ज्यात आलम भाई पिंदाचा मृत्यूचा आरोप स्वत:वर घेतो आणि हे करण्यासाठी तो आधी हमजाची समजूत काढत असतो. मला फक्त याच कठीण आणि गंभीर सीनसाठी ऑडिशन द्यायची होती."
तो पुढे म्हणाला, "मला ही भूमिका मिळाली तेव्हा तो माझ्यासाठी सुखद धक्काच होता. कारण हमजाचा पाकिस्तानला एकमेव सपोर्ट आलम भाईच होता. याआधीही मी आदित्य धरच्याच एका प्रोजेक्टसाठी मुकेश छाबडाला भेटलो होतो. पण तेव्हा माझी निवड होऊ शकली नव्हती. पण यावेळी मला मेहनतीचं फळ मिळालं कारण मला माझ्या अभिनयावर पूर्ण विश्वास होता."
'धुरंधर' रिलीज झाल्यानंतर आलम भाईची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली. त्यात तो गौरव गेरा आहे हे समजल्यानंतर तर प्रेक्षक वेडेच झाले. त्याचा 'डार्लिंग डार्लिंग दिल क्यो तोडा...' हा डायलॉग गाजला. गौरवने आपल्या लूकमधून आणि अभिनयातून प्रेश्रकांचं मन जिंकलं.
Web Summary : Gaurav Gera, initially unrecognizable as Alam Bhai in 'Dhurandhar', revealed his audition involved a challenging, intense scene. Securing the role, a pleasant surprise, validated his belief in his acting abilities. His performance resonated deeply with audiences.
Web Summary : 'धुरंधर' में आलम भाई के रूप में पहचाने न जाने वाले गौरव गेरा ने खुलासा किया कि उनके ऑडिशन में एक चुनौतीपूर्ण सीन था। भूमिका मिलने से आत्मविश्वास बढ़ा। उनके अभिनय को दर्शकों ने सराहा।