Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाहा, गौहर खान व जैदच्या ‘चिक्सा’ सेरेमनीचे फोटो; जबरदस्त डान्स अन् धम्माल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 11:00 IST

‘गाजा’ सेलिब्रेशन...

ठळक मुद्दे  गौहर व जैद  यांच्या वयातील अंतर. होय, गौहर तिच्या होणा-या पतीपेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे. यावरून गौहर ट्रोल सुद्धा होत आहे. अलीकडे तिने या ट्रोलर्सला सणसणीत उत्तर दिले होते.

अभिनेत्री गौहर खान आणि तिचा बॉयफ्रेन्ड जैद दरबार येत्या शुक्रवारी म्हणजे 25 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. तूर्तास या लग्नाच्या प्री-वेडिंग सेरेमनी सुरु झाल्या आहेत आणि याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ‘निकाह’च्या आधी सोमवारी चिक्साची विधी करण्यात आली. याचे फोटो आणि गौहरचा डान्स व्हिडीओने इंटरनेटवर धूम केली आहे. गौहर व जैदने आपल्या लग्नाला ‘गाजा’ असे नाव दिले आहे. हे नाव का, तर वर-वधूच्या नावातील काही अक्षरांना जोडून दिलेले टोपणनाव. ‘गाजा’ने चिक्सा सेरेमनीचे फोटो आपआपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केले आहेत.

यात गौहर व जैद दोघेही पिवळ्या रंगाच्या मॅचिंग आऊटफिटमध्ये दिसत आहेत. गौहरने  गौहरने पिवळ्या रंगाचा लेहंगा तर जैदने पिवळा कुर्ता परिधान केला आहे. दोघांच्याही चेह-यावरचा आनंद जणू ओसंडून वाहतोय.

फोटोंना दोघांनीही सेम टू सेम कॅप्शन दिले आहे.  तूर्तास या होणा-या वर-वधूवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. हिना खान, जय भानुशाली, मुक्ती मोहन आदी सेलिब्रिटींनीही या कपलला शुभेच्छा दिल्या आहेत.

चिस्का सेरेमनीत गौहर व जैदचे डान्स व्हिडीओही जबरदस्त आहेत. गौहर व जैदसोबत त्यांच्या कुटुंबीयांनाही जबरदस्त डान्स केला आहे.जैद हा अभिनेता, इफ्लूएंसर, कंटेट क्रिएटर आहे. सोशल मीडियावर त्याचे भरपूर फॉलोअर्स आहेत. तो एक प्रोफेशनल डान्सरही आहे.तो म्युझिक व्हिडीओ छमियामध्ये शक्ती मोहन आणि वेस्ट इंडीजचा क्रिेकेटर ड्वेन ब्राओसोबत दिसला होता.  

  गौहर व जैद  यांच्या वयातील अंतर. होय, गौहर तिच्या होणा-या पतीपेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे. यावरून गौहर ट्रोल सुद्धा होत आहे. अलीकडे तिने या ट्रोलर्सला सणसणीत उत्तर दिले होते.

‘आम्हा दोघांच्या वयात 12 वर्षांचे अंतर आहे, आधी तर ही गोष्ट खोटी आहे. लोकांना चघळायला विषय हवे असतात आणि ते बनवणे सोपे आहे. पण आमच्यात 12 वर्षांचा फरक आहे, हे खोटे आहे. तो माझ्यापेक्षा लहान आहे, हे मी मान्य करते. पण 12 हा आकडा खोटा आहे. तो माझ्यापेक्षा वयाने लहान असला तरी खूप समजूतदार आणि विचारांनी प्रगल्भ आहे.  वयाच्या अंतरावरून टीका करणे, ट्रोल करणे सोपे आहे. पण याचा त्या जोडप्याच्या नात्यावर परिणाम होऊ शकतो, हेही खरे आहे. अर्थात जैद आणि माज्या नात्यावर अशा ट्रोलिंगचा काहीही परिणाम होणार नाही. आमच्या दोघेही समजूतदार आहोत. तेवढी प्रगल्भता आमच्याकडे आहे. त्यामुळे आमचे नाते खूप मजबूत आहे,’असे ती म्हणाली होती.

टॅग्स :गौहर खान