बॉलिवूडमध्ये अविस्मरणीय चित्रपट आणि गाण्यांची संख्या तशी खूप मोठी आहे; मात्र काही गाणी अशीही आहेत, जी केवळ सणासुदीच्या काळात हमखास कानावर पडतात. येत्या नवरात्रोत्सवात यातील काही गाणी आपल्याला ऐकावयास मिळतीलच. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या नव्या गाण्यांबरोबरच जुन्या गाण्यांना आजही तरुणाईकडून पसंती मिळते. मग ते अलीकडच्या काळातील ‘रामलीला’मधील ‘नगाडे संग ढोल बाजे’ हे गाणे असो वा महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘सुहाग’मधील ‘हे राम रे सबसे बडा तेरा नाम’ हे गाणे असो. यावर तरुणाई बेंधुद होऊन गरबा, दांडिया खेळताना दिसते. सध्या याची रंगीत तालिम सुरू असल्याने या नवरात्रोत्सव सॉँगचा घेतलेला हा आढावा...
‘रामलीला’ या सुपरहिट चित्रपटात दीपिका पादुकोन आणि रणबीर सिंग यांच्यावर चित्रित केलेल्या ‘नगाडे संग ढोल बाजे’ हे गाणे यंदाच्या नवरात्रोत्सवात धूम उडवून देईल, यात शंका नाही. खरं तर ‘रामलीला’मधील सर्वच गाणे गरबा, दांडिया खेळण्यासाठी रचलेले असावेत. त्यामुळे ‘लहू मुॅँह लग गया’ हे गाणेही नवरात्रोत्सवात धूम उडवून देईल.
‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातील ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांचे ‘ढोली तारो ढोल बाजे’ हे गाणे गेल्या कित्येक वर्षांपासून नवरात्रोत्सवातील आवाज बनले आहे. नवरात्रोत्सव अन् ढोली थारो ढोल बाजे हे गीत जणू काही समीकरणच बनले आहे. बºयाचदा ऐश्वर्या आणि सलमानने या गाण्यात केलेल्या डान्सची लोक दांडिया खेळताना कॉपी करताना बघावयास मिळतात.
राधा कैसे न जले
मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान याच्या सुपरहिट ‘लगान’ या चित्रपटातील ‘राधा कैसे न जले’ हे गाणेदेखील नवरात्रोत्सवात हमखास वाजविले जाते. या गाण्याच्या तालावर तरुणाई बेधुंद होऊन दांडिया खेळत असते. त्यामुळे हे गाणे नवरात्रोत्सवात आॅल टाइम फेव्हरेट ठरत आहे.
‘काय पो छे’ या चित्रपटातील ‘शुभारंभ’ हे गाणेदेखील गेल्या काही वर्षांपासून नवरात्रोत्सवात ऐकावयास मिळत आहे. दांडिया तथा गरबा खेळण्यासाठी हे गाणे लोकांच्या पसंतीस उतरले आहे. गरबा खेळताना गाण्यात राज कुमार यादव याने धरलेला ताल लोक कॉपी करताना बघावयास मिळतात.
‘कहो ना प्यार है’ या चित्रपटानंतर ‘आप मुझे अच्छे लगने लगे’मध्ये एकत्र आलेल्या ऋतिक रोशन आणि अमिशा पटेल यांच्या ‘ओ रे गोरी’ हे गाणेदेखील नवरात्रोत्सवातील फेव्हरेट सॉँग आहे. दांडिया खेळण्यासाठी हे गाणे लोकांचे फेव्हरेट ठरत आहे.
‘देवदास’ या सुपरहिट चित्रपटातील ‘मन डोला रे’ हे गाणेदेखील नवरात्रोत्सवात ऐकावयास मिळते. वास्तविक या गाण्याचा दांडिया किंवा गरबा खेळण्याशी फारसा संबंध नाही. परंतु गाण्यातील म्युझिक दांडिया तथा गरबा खेळण्यासाठी परफेक्ट असल्याने हे गाणे गेल्या काही दिवसांपासून नवरात्रोत्सवात वाजविले जाते.
१९७९ मध्ये आलेल्या अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या ‘सुहाग’ या चित्रपटातील ‘हे राम रे, सबसे बडा तेरा नाम’ हे गाणे तर जणू काही लोकांच्या गळ्यातील ताईतच बनले आहे. नवरात्रोत्सवात आजही हे गाणे इतर गाण्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात वाजविले जाते.
नाना पाटेकर यांच्या ‘क्रांतिवीर’ या चित्रपटातील ‘जय अंबे जगदंबे मॉँ’ हे गाणेदेखील नवरात्रोत्सवातील फेव्हरेट सॉँग आहे. गेल्या काही वर्षांपासून या गाण्याची क्रेझ कायम आहे. satish.dongare@lokmat.com