Join us
Daily Top 2Weekly Top 5

हड्डी सिनेमात नवाजुद्दीन सिद्दिकीसोबत झळकतेय 'ही' मराठी अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 15:46 IST

काही दिवसांपुर्वीच नवाजुद्दिनचा हिरव्या साडीतील फोटो पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. यासोबतच मराठीतील आणखी एक अभिनेत्री चर्चेत. ही अभिनेत्री फोटोमध्ये नवाजच्या बाजुलाच उभी आहे. 

बॉलिवुड अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी त्याच्या आगामी सिनेमातील लुकमुळे चर्चेत आहे. पुढील वर्षी रिलीज होणाऱ्या हड्डी सिनेमात नवाजुद्दिन ट्रांसजेंडरच्या भुमिकेत आहे. काही दिवसांपुर्वीच नवाजुद्दिनचा हिरव्या साडीतील फोटो पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. यासोबतच मराठीतील आणखी एक अभिनेत्री चर्चेत. ही अभिनेत्री फोटोमध्ये नवाजच्या बाजुलाच उभी आहे. 

ट्रांसजेंडरच्या भुमिकातील नवाजचा लुक खुपच चर्चेत आहे. आधी ग्रे गाऊनमधला नवाजचा फोटो व्हायरल झाला होता. आता नुकत्याच समोर आलेल्या हिरव्या साडीतील, टिकली लावलेला नवाज ओळखणेच कठीण आहे, मात्र नवाजच्या बाजुला उभ्या असलेल्या एका मराठी अभिनेत्रीलाही तुम्ही ओळखलं नसेल. ही आहे मराठीतील पहिली ट्रांसजेंडर अभिनेत्री गंगा. गंगाचे आधीचे नाव प्रणीत हट्टे

गंगा कारभारी लयभारी या मराठी चित्रपटात दिसली होती. सोबतच तिने युवा डान्सिंग क्वीन या शोचे सूत्रसंचालनही केले आहे. गंगाने आयुष्यात प्रचंड संघर्ष केला. मध्यंतरी तिच्याकडे कामही नव्हते. मात्र आता नवाजुद्दीन सिद्दिकी सोबत हड्डी या सिनेमातुन गंगाला काम करण्याची संधी मिळाली आहे. यासोबत हे तिचे बॉलिवुडमध्ये पदार्पण असेल.गंगाने केलेल्या मेहनतीचे फळ आज तिला मिळाले आहे.  

टॅग्स :ट्रान्सजेंडरनवाझुद्दीन सिद्दीकीमराठी अभिनेता