Join us
Daily Top 2Weekly Top 5

गहिवरले कपूर कुटुंबीय; म्हणाले,‘मॉम’चे यश सेलिब्रेट करण्याचा क्षण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 15:47 IST

दिल्ली येथे ६५ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली अन् त्यात कै. अभिनेत्री श्रीदेवी यांना त्यांच्या ‘मॉम’ या चित्रपटासाठी ‘बेस्ट ...

दिल्ली येथे ६५ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली अन् त्यात कै. अभिनेत्री श्रीदेवी यांना त्यांच्या ‘मॉम’ या चित्रपटासाठी ‘बेस्ट अ‍ॅक्टर’ चा पुरस्कार जाहीर झाला. याविषयी बोलताना बोनी कपूर, जान्हवी आणि खुशी कपूर यांनी म्हटले,‘हा क्षण आमच्यासाठी खूप खास आहे. ती परफेक्शनिस्ट होती. तिने ३०० पेक्षा अधिक चित्रपट केले. ती केवळ बेस्ट अभिनेत्रीच नव्हे तर एक उत्कृष्ट पत्नी आणि आई देखील होती. तिचे हे यश सेलिब्रेट करण्याची ही वेळ आहे. ती आज आमच्यासोबत नाही मात्र आम्ही तिचा हा वारसा कायम हृदयात ठेवू. आम्ही भारतीय सरकार, माननीय ज्युरी मेंबर्सचे आभार मानतो. आम्ही ‘मॉम’च्या संपूर्ण टीमचे आणि चाहत्यांचे यानिमित्ताने आभार मानू इच्छितो.’फेब्रुवारी महिन्यात बॉलिवूडची हवाहवाई अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधन झाले. ५४ वर्षीय श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी येताच संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त करण्यात आली. श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर ही त्यांची लाडकी मुलगी. ती श्रीदेवी यांच्या निधनावेळी तिचा बॉलिवूडचा डेब्यू चित्रपटाची शूटिंग करत होती.