Join us  

Gadar 3: शूटपासून ते रिलीज डेटपर्यंत वाचा अपडेट, न्यू ईयरच्या मुहुर्तावर घोषणा होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 11:43 AM

'गदर 2' च्या यशामुळे सनी देओलची मोठ्या पडद्यावरील क्रेझ परत आली आहे.

Gadar 3: 'गदर 2'च्या तुफान यशानंतर सनी देओलच्या (Sunny Deol) 'गदर 3'चीही लवकरच घोषणा होणार आहे. चाहत्यांना तिसऱ्या भाग कधी येणार याची आतुरता होती. दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार, पुढील वर्षी 'गदर 3' च्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. २००१ साली गदर रिलीज झाला होता. तर याचा दुसरा भाग येण्यासाठी २२ वर्ष लागली. आता तिसऱ्या भागासाठी जास्त उशीर करायचा नसल्याची मेकर्सची योजना आहे.

'गदर 2' च्या यशामुळे सनी देओलची मोठ्या पडद्यावरील क्रेझ परत आली आहे. तसंच मेकर्सलाही त्याच्या स्टारडमवर विश्वास आहे. तसंच सध्या अॅक्शन फिल्म्सचाच ट्रेंड आलाय. हे पाहता मेकर्स न्यू इयरच्या मुहुर्तावर 'गदर 3' ची घोषणा करतील अशी शक्यता आहे. तर पुढील वर्षी ऑगस्ट महिन्यात सिनेमाच्या चित्रीकरणालाही सुरुवात होईल. तर 2025 मध्ये स्वातंत्र्यदिनालाच सिनेमा रिलीज करण्यात येईल. 

दिग्दर्शक अनिल शर्मा फिल्म्सचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर राणा भाटिया यांच्यनुसार, तिसऱ्या भागात सिनेमाची मेन कास्टच असणार आहे. म्हणजेच तारासिंग आणि त्याचं कुटुंब असणार आहे. मात्र यामध्ये व्हिलन म्हणून कोणाला घ्यायचं यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही. 

टॅग्स :सनी देओलसिनेमाबॉलिवूडनववर्ष