Join us

'गदर 2' चा ग्रँड ट्रेलर लाँच, सनी देओलचा ढोल ताशाच्या गजरात भांगडा, चाहते भारावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 08:54 IST

सनी देओल आणि अमिषा पटेलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Gadar 2 Trailer Launch : मोठ्या प्रतिक्षेनंतर अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अभिनेत्री अमिषा पटेल (Amisha Patel) ही जोडी 'गदर 2' मधून कमबॅक करतेय. 2001 साली आलेल्या 'गदर' सिनेमाने थिएटर हादरवून सोडलं होतं. तर आता 22 वर्षांनंतर 'गदर 2' रिलीज होतोय. तारा सिंग आणि सकीनाची जोडी मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. कालच सिनेमाचा ट्रेलर लॉंच सोहळा पार पडला. यावेळी सनी देओलने ढोल ताशाच्या गजरात नाचताना दिसला.

सनी देओल आणि अमिषा पटेलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये दोघंही एका ट्रकसमोर उभे राहून फोटोसाठी पोज देत आहेत. जसा ढोल वाजायला सुरुवात झाली, सनी देओल स्वत:ला थांबवू शकला नाही आणि त्याने भांगडा करायला सुरुवात केली. कुर्ता पायजमा मधअये सनीने ठेका धरला तर अमिषाने यावेळी लाल रंगाचा शरारा घातला होता. सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानी यांनी व्हिडिओ पोस्ट केला आहे.

ग्रँड अंदाजात ट्रेलर रिलीज 

'गदर 2' चा ट्रेलर सोहळा भव्य अंदाजात पार पडला. दिग्दर्शक अनिल शर्मा, सनी देओल, अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा, मिथुन, अलका याज्ञिक, जुबिन नॉटियाल आणि आदित्य नारायण यांनी हजेरी लावली.  1971 च्या भारत पाकिस्तान  युद्धावर सिनेमा आधारित असून तारा सिंग आपल्या मुलाला वाचवण्यासाठी पाकिस्तानशी लढताना दिसणार आहे. 

सनी पाजीने मानले चाहत्यांचे आभार

सिनेमाविषयी बोलताना सनी देओल म्हणाला,'गदर :एक प्रेम कथा' ला प्रेक्षकांनी दिलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादासाठी मी सर्वांचे आभार मानतो. मी आश्वासन देतो की गदर 2 दुप्पट अॅक्शन, इमोशन आणि मनोरंजन देईल.'

टॅग्स :सनी देओलअमिषा पटेलबॉलिवूडसिनेमा