रोबोट-२ मध्ये रजनीकांतसमोर अँमी ज्ॉक्सन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 05:33 IST
सुपरस्टार रजनीकांतची बातच 'काही और' असते. त्याच्या चित्रपटात सर्व काही अतिभव्य, अचाट असते. त्याच्या २0१0 मध्ये आलेल्या 'रोबोट' या ...
रोबोट-२ मध्ये रजनीकांतसमोर अँमी ज्ॉक्सन
सुपरस्टार रजनीकांतची बातच 'काही और' असते. त्याच्या चित्रपटात सर्व काही अतिभव्य, अचाट असते. त्याच्या २0१0 मध्ये आलेल्या 'रोबोट' या सायन्स फिक्शन अँक्शन चित्रपटात ऐश्वर्या राय ही सौंदर्यवती होती. तमिळमधील टॉपचा दिग्दर्शक शंकर याचा हा चित्रपट चांगलाच गाजला. आता त्याचा दुसरा भाग म्हणजे 'रोबोट-२' येऊ घातलाय. यात ऐश्वर्या नाही. मात्र हॉलिवूडची मदनिका अँमी ज्ॉक्सन प्रमुख रोलमध्ये असल्याचे कळते.अँमी नुकतीच लॉस एंजेलिसमध्ये होती. तेथे तिची 'प्रतिकृती' तयार करण्यात आली. त्यावरून तिचे या चित्रपटातील वेगवेगळे ड्रेस तयार करण्यात आले आहेत. चित्रपट सायन्स फिक्शन असल्याने तिची वेषभूषा तशीच असणार आहे. याबाबत अँमीची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मात्र पुढील वर्षी २0१६ मध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार असल्याची निश्चित खबर आहे.