‘दंगल’ ठरला बॉलिवूडमध्ये चार नायिकांचा डेब्यू चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 18:01 IST
या वर्षातील सर्वांत बहुप्रतिक्षित आमिर खानचा ‘दंगल’ हा २३ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाबाबत अनेक चर्चा सुरू आहे. ...
‘दंगल’ ठरला बॉलिवूडमध्ये चार नायिकांचा डेब्यू चित्रपट
या वर्षातील सर्वांत बहुप्रतिक्षित आमिर खानचा ‘दंगल’ हा २३ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाबाबत अनेक चर्चा सुरू आहे. सर्वाधिक चर्चा आमिर खानची असली तरी या चित्रपटात आमिरच्या मुलींच्या भूमिकेत असणाºया अभिनेत्रींची चर्चा चांगलीच रंगली आहे. आमिर खान प्रॉडक्शनच्या ‘दंगल’ या चित्रपटातून एकाच वेळी चार नव्या अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये लाँच केले आहे. आतापर्यंत बॉलिवूडमध्ये एखाद्या निर्मात्यांकडून एका नव्या अभिनेत्रीला संधी दिली अशी चर्चा होत होती. दोन अभिनेत्रींना एकाच वेळी एकाच चित्रपटातून पदार्पण केले हे देखील फारच कमीवेळा घडले. मात्र आमिर खाने ही परंपरा तोडत दंगल या चित्रपटासाठी चार नव्या अभिनेत्रींचा शोध घेतला व त्यांना याच चित्रपटातून संधी देण्यात आली. या अभिनेत्री आहेत, फातिमा सना शेख, जायरा वसीम, सान्या मल्होत्रा आणि सुहानी भटनागर. या चारही अभिनेत्रींनी गीता आणि बबिता यांच्या भूमिका केल्या आहेत हे विशेष. तरुण गीता फोगटची भूमिका फातिमा सना शेख हिने केली आहे, तर बालपणीची भूमिका जायरा वसीम हिने साकारली. तरुण बबिताची भूमिका सान्या मल्होत्राने तर बालपणीची भूमिका सुहानी भटनागर हिने केलीय. या चौघींनी आपल्या भूमिकांना स्क्रीनवर जिवंत केले आहे. ट्रेलर पाहून किंवा चित्रपट पाहून असे वाटतच नाही की हा त्याचा पहिला चित्रपट असावा. चौघींची केमेस्ट्री मिस्टर परफेक्शनिस्ट सोबत जुळून आली आहे. आमिर खान याचा नवा चेहºयासोबत काम करण्याचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. आठ वर्षांपूर्वी आमिर खान प्रॉडक्शनने नव्या चेहºयांना संधी दिली होती. पैेलवान महावीर सिंग फोगट यांचा बायोपिक दंगलमध्ये आमिर खानने महावीरची भूमिका साकारली आहे. आमिर खान -किरण राव व सिद्धार्थ रॉय कपूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शन नितेश तिवारी याने केले आहे.